Oil Price: रशियन तेलाची किंमत ठरवण्यासाठी भारत, अमेरिका युतीमध्ये सामील होणार?

अमेरिकेने भारताला रशियन तेलाची (Russia Oil) किंमत मर्यादा निश्चित करण्यासाठी युतीमध्ये सामील होण्यास सांगितले.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Dainik Gomantak
Published on
Updated on

Price Cap On Russian Oil: अमेरिकेने शुक्रवारी भारताला रशियन तेलाची (Russia Oil) किंमत मर्यादा निश्चित करण्यासाठी युतीमध्ये सामील होण्यास सांगितले. या युतीचे उद्दिष्ट मॉस्कोसाठी उत्पन्नाचे स्रोत मर्यादित करणे आणि जागतिक उर्जेच्या किमती कमी करणे हे आहे. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे उप अर्थमंत्री वॅली अडेमो (Wally Adeyemo) यांनी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाच्या कमाईवर मर्यादा आणण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

यावेळी उभय देशांमधील आर्थिक संबंध दृढ करण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. जर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल US $ 100 पेक्षा जास्त असेल तर अमेरिका आणि इतर G-7 देश रशियन तेलावर किंमत मर्यादा लादण्याचा विचार करत आहेत. अदेयेमो म्हणाले की, 'रशियाचा ऊर्जा आणि अन्न व्यापार निर्बंधांच्या बाहेर ठेवण्यात आला आहे आणि भारतासारखे देश स्थानिक चलनासह कोणतेही चलन वापरून व्यापार करू शकतात.'

Nirmala Sitharaman
Edible Oil Price: मोहरीचे तेल स्वस्त, सोयाबीनचेही घसरले दर

भारताने प्रथम स्वारस्य दाखवले - अदेयेमो

अदेयेमो पुढे म्हणाले की, भारताने रशियाकडून येणाऱ्या तेलाच्या किमती मर्यादित करण्याच्या प्रस्तावात सखोल स्वारस्य दाखवले आहे. ते म्हणाले की, 'किंमत मर्यादामुळे रशियाचा महसूल कमी होईल. विशेष म्हणजे युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मी भारतीय अधिकारी आणि धोरण निर्मात्यांना किंमत मर्यादा निश्चित करण्यासाठी एकत्र येण्याबद्दल बोललो आहे आणि त्यांनी देखील या विषयात उत्सुकता दर्शविली आहे. हे ग्राहकांसाठी ऊर्जेच्या किमती कमी करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. आम्ही त्यांना याबाबत माहिती देत ​​असून या विषयावर संवाद सुरूच राहणार आहे.'

Nirmala Sitharaman
Edible Oil Price Reduced: अदानी विल्मरने खाद्यतेलात केली 30 रुपयांनी कपात, जाणून घ्या नवे दर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदेयेमो यांची भेट घेतली

भारतासह काही देशांनी रशियाकडून तेलाची खरेदी वाढवली आहे आणि हे पाहता अमेरिकेला रशियाकडून येणाऱ्या तेलाच्या किमतींवर मर्यादा घालायची आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अदेयेमो यांची भेट घेतली आणि इंडो-पॅसिफिक आर्थिक फ्रेमवर्क आणि भारताचे G20 अध्यक्षपद यासह विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com