India World Record In Road Infrastructure: रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड, चीन-जपान आणि फ्रान्सला टाकले मागे

Road Infrastructure: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या देशातील पायाभूत सुविधा जगातील विकसित देशांनाही मागे टाकत आहेत.
Road Infrastructure
Road InfrastructureDainik Gomantak
Published on
Updated on

India Sets World Record In Road Infrastructure: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या देशातील पायाभूत सुविधा जगातील विकसित देशांनाही मागे टाकत आहेत. गेल्या नऊ वर्षांत देशातील रोड इन्फ्रास्ट्रक्चरने जगातील मोठ्या आणि विकसित देशांनाही मागे टाकले आहे.

भारताने चीन, जपान, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांना सर्वोत्तम रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत जागतिक विक्रम करुन मागे टाकले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी 7 जागतिक विक्रम प्रस्थापित करताना, रस्ते पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत (India) आता अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, देशात युद्धपातळीवर द्रुतगती मार्ग आणि महामार्गांचे जाळे विणले जात आहे. 2014 पूर्वी, देशातील सरासरी दैनंदिन रस्त्यांची बांधणी 11.6 किलोमीटर होती, ती आता 30 किलोमीटरपर्यंत वाढली आहे.

म्हणजेच आधीच्या तुलनेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. गडकरी पुढे म्हणाले की, 2020-21 या वर्षात रस्त्यांच्या कामांनी सरासरी दैनंदिन 47 किमीचा टप्पा गाठला होता, परंतु कोरोना काळात त्याच्या गतीमध्ये थोडीशी घट झाली होती.

पण तरीही देशात रोज 30 किलोमीटरचे रस्ते बनवले जात आहेत. हा एक नवा विक्रम आहे. आता रस्ते बांधणीला पुन्हा वेग येईल, असेही ते म्हणाले.

Road Infrastructure
Nitin Gadkari on Trucks: ट्रक चालकांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा, ऐकून तुम्हीही आनंदाने माराल उड्या

पीएम मोदींच्या कार्यकाळात रस्त्यांचे जाळे

नितीन गडकरी म्हणाले की, ईशान्य ते संपूर्ण भारतात नवीन रस्त्यांच्या बांधणीचे काम वेगाने सुरु आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) पर्वतीय भागात वेगाने रस्त्यांचे जाळे विणत आहे.

बोगदे बनवून रस्ते पायाभूत सुविधांना गती दिली जात आहे. त्यामुळे भारतात निर्यात, रोजगार, व्यापार, गुंतवणूक (Investment) आणि पर्यटनातही वाढ होताना दिसत आहे.

रस्त्यांचे जाळे 91 हजारांवरुन 1.45 लाख किलोमीटरवर पोहोचले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, यापूर्वी देशातील रस्त्यांचे जाळे 91,287 किमी होते. गेल्या 9 वर्षांत 59 टक्के वाढ झाली आहे. आता ते 145,240 किमी झाले आहे. त्यात एनएचआयने केलेल्या सात जागतिक विक्रमांचाही समावेश आहे.

ते पुढे म्हणाले की, भारत हा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे रस्ते नेटवर्क असलेला देश बनला आहे. यापूर्वी देशात 18,371 किलोमीटरचे चौपदरीकरण होते.

देशात बांधण्यात आलेल्या एकूण रस्त्यांपैकी हे प्रमाण 20 टक्के होते. आता ते 31 टक्क्यांनी वाढून 44,654 किमी झाले आहे. यामुळे वाहतूक घनता सुधारली आहे.

Road Infrastructure
Nitin Gadkari: नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी, हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना...!

टोल नाक्यावर प्रतीक्षा वेळ कमी केला

नितीन गडकरी म्हणाले की, यापूर्वी देशात 45, 319 किलोमीटरचे 2 लेनचे रस्ते होते. ते आता 83,941 किमी व्यापले आहे. 16 हजार किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे दुपदरीकरणातून चौपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

यासोबतच टोल नाक्यांवर थांबण्याची वेळही खूप कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, टोल बूथवर सरासरी पहिली प्रतीक्षा वेळ 12 मिनिटांपर्यंत होती. आता 2023 मध्ये टोल नाक्यांची प्रतीक्षा सरासरी 47 सेकंदांवर आली आहे. पुढे ते 30 सेकंदांपेक्षा कमी केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com