Independence Day Shopping: ऑनलाइन शॉपिंगसाठी या 5 क्रेडिट कार्डचा होऊ शकतो फायदा

अनेक ई-कॉमर्स कंपन्या स्वातंत्र्य दिना निमित्त खास सेलचे आयोजन करत आहेत.
Credit  Card
Credit Card Dainik Gomantak
Published on
Updated on

अनेक ई-कॉमर्स कंपन्या स्वातंत्र्य दिना (Independence Day) निमित्त खास सेलचे आयोजन करत आहेत. अॅमेझॉनचा ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सुरू झाला आहे. या सणासुदीच्या काळात रिलायन्स डिजिटलने 6 ऑगस्टपासून डिजिटल इंडिया सेलची देखील घोषणा केली आहे. (Independence Day Shopping These 5 Credit Cards Can Benefit You For Online Shopping)

Credit  Card
Indian Train New Rule : वंदे भारत एक्सप्रेस बनली देशातील पहिली व्हेज ट्रेन; आता खाता येणार नाही नॉनव्हेज

बर्‍याच ऑफर ICICI बँक, Axis बँक, HDFC बँक, Citibank, SBI कार्ड आणि इतर बँकांसारख्या विशिष्ट क्रेडिट कार्डांसाठी चालू झाल्या आहेत. दरम्यान बाजारात अशी काही क्रेडिट कार्डे आहेत जी ऑनलाइन खरेदी अधिक फायदेशीर करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहेत. अशा 5 क्रेडिट कार्डांबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये ऑनलाइन शॉपिंगचे तुम्हाला चांगले फायदे मिळतील.

Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड:

प्राइमच्या सदस्यांसाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम सदस्यांसाठी 3 टक्के, Amazon पे ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून Amazon अॅप किंवा वेबसाइटवर केलेल्या खरेदीसाठी अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट देखील उपलब्ध आहेत. Amazon वर, या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. Amazon व्यतिरिक्त कोठेही पेमेंट केल्यावर 1% अमर्यादित रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात आणि हे कार्ड आजीवन मोफत आहे.

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड:

Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून Flipkart आणि Myntra वर केलेल्या खरेदीसाठी 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे तसेच या कार्डसह, Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure. Fit, Tata 1MG आणि Tata Sky वर खर्च करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अमर्यादित कॅशबॅक उपलब्ध आहे आणि या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे.

Credit  Card
Ola इलेक्ट्रिक कार बघून थक्क व्हाल, जाणून घ्या फिचर्स आणि बरच काही

HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड

HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड Amazon, Flipkart, Bookmyshow, Cult.fit, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वरील खर्चावर 5 टक्के कॅशबॅक देखील आहे. याशिवाय, इंधन वगळता सर्व व्यवहारांवर (वॉलेट व्यवहार आणि ईएमआयसह) 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहेत.

SBI SimplyCLICK क्रेडिट कार्ड वापरून

Amazon, Apollo24X7, BookMyShow, Cleartrip, Eazydiner, Lenskart आणि Netmeds वर खर्च करण्यासाठी 10X रिवॉर्ड पॉइंट्स SBI SimplyCLICK क्रेडिट कार्ड वापरून या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च करण्यासाठी 5X रिवॉर्ड पॉइंट उपलब्ध आहेत. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये एवढी आहे.

HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड

HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड सर्व ऑनलाइन खर्चांवर 1.5 टक्के आणि इतर प्रकारच्या खर्चावर 1 टक्के कॅशबॅक देते आहे आणि या कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com