Income Tax Slab Rates 2022: अशी असणार या वर्षाची कर रचना

प्राप्तीकरच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. 2020 मध्ये बदलण्यात आलेली कर रचना ही सलग तिसऱ्या वर्षीही तशीच ठेवण्यात आली आहे.
Tax slab 2022 -2023
Tax slab 2022 -2023Dainik Gomantak
Published on
Updated on

2022 -23023 च्या अर्थसंकल्पात कर सवलत मिळणार या संदर्भात विवीध घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र या सर्वसामान्य लोकांच्या स्वपनांवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अखेर पाणीच फेरले आहे. करोनामुळे देशाला बसलेला आर्थिक फटका, वाढलेली बेरोजगारीचे प्रमाण आणि मागच्या वर्षीही अर्थसंक्ल्पात न मिळालेला कर दिलासा तसेच पाच राज्यांमधील होत असलेल्या विधानसभा निवडणुका या संदर्भात मोदी सरकारकडून या अर्थसंकल्पात आशा होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनी त्यांच्या कार्यकाळातला चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्राप्तीकरच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. 2020 मध्ये बदलण्यात आलेली कर रचना (Tax slab 2022-23 )ही सलग तिसऱ्या वर्षीही तशीच ठेवण्यात आली आहे. यामुळे सामान्य लोकांना यातून निराशा मिळाली. (Latest Income tax slab rates 2022 News Update)

Tax slab 2022 -2023
Union Budget 2022: महिलांसाठी 'मिशन वात्सल्य' योजनेची घोषणा

अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅब बदलणार नसल्याचं जारी केल्याने आर्थिक वर्ष 2022-23 साठीचं इनकम टॅक्स (Income tax)कलेक्शन हे जैसेथेज आहे. 2020 च्या अर्थसंकल्पात (Budget) पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. ही घोषणा मागील अर्थसंकल्पामध्ये निर्मला सितारमन यांनी केली होती. हीच कररचना सलग तिसऱ्या वर्षीही कायम ठेवली आहे.

2019 पर्यंत 5 ते 10 लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागत होता. परंतू दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 च्या अर्थसंकल्पात त्याला दोन भागात विभगण्यात आले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले होते. हीच कररचना 2021- 22 व 2022-2023 सारखी ठेवण्यात आली.

अशी असेल 2022 - 23 ची कर रचना

5 लाखांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही
5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आकारणार
7.5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के कर आकारणार
10 ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारणार
125.5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर आकारणार
15 लाखांच्या पुढील उत्पन्नावर 30 टक्के कर आकारणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com