Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु

आयकर विभागात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.
Income Tax Recruitment 2023
Income Tax Recruitment 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी तरुणांसाठी उपल्बध झाली आहे. आयकर विभागात इंस्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती अभियानात एकूण 20 पदे भरली जाणार आहेत.  

या पदांसाठी इच्छुक उमेदवार आयकर चंदीगडच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑफलाईन नोंदणी देखील सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

  • नियम आणि अटी

इनकम टॅक्स इंस्पेक्टर आणि टॅक्स असिस्टेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. इनकम टॅक्स इंस्पेक्टर पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय 30 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवाराला 10 वी उतीर्णची मर्यादा ठेवण्यात आली आहे. याशिवाय, उमेदवाराचे वय 18 ते 25 असणे गरजेचे आहे.

टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 18 ते 27 वयोगटातील असावा.

इनकम टॅक्स इंस्पेक्टरपदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला 44900-142400 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तर, टॅक्स असिस्टंट पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला 25500-81100 हजार रुपये मासिक वेतन मिळणार . याशिवाय, मल्टी टास्किंग स्टाफसाठी मासिक वेतन 18000- 56900 हजार रुपये इतके ठरवण्यात आले आहे.

Income Tax Recruitment 2023
Driving License New Rules: आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी द्यावी लागणार 'ही' परीक्षा!

आयकर विभागात 21 फेब्रुवारीपासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज रजिस्टर्ड डाक किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून Dy. Commissioner of Income Tax (Hq)(Admn), O/o the Principal Chief Commissioner of Income Tax, NWR, Aayakar Bhawan, Sector-17E, Chandigarh-160017 या पत्त्यावर पाठवावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com