आधार कार्ड हरवले असेल तर मग असे करा डाउनलोड

आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card )हे एक महत्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे.
आधार कार्ड हरवलयं, मग ही बातमी नक्की वाचा
आधार कार्ड हरवलयं, मग ही बातमी नक्की वाचाDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card )हे एक महत्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे. आधार कार्डविना आपले अनेक काम करतांना समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ते सहज डाउनलोड (Download) करू शकता. यासाठी काही सोप्या स्टेप्स (Stapes) फॉलो केल्यानंतर तुम्ही घर बसल्या आधार कार्ड (Aadhaar Card) डाउनलोड करू शकता.

UIDAI द्वारे जारी केलेले आधार कार्ड (Aadhaar Card) अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण देशातील सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाचे आहे. या कागदपत्राचा वापर बँक खाते (Bank Account) उघडण्यासाठी, शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो.

आधार कार्ड हरवलयं, मग ही बातमी नक्की वाचा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मंदी, सेन्सेक्स घसरला

Aadhar Card डाउनलोड करण्याची पद्धत

  • आधार कार्ड (Aadhar Card)डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट https://uidai.gov. in/ वर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला Download Aadhar च्या Get Aadharपर्यायावर जावे लागेल.

  • आता तुम्हाला येथे 12 अंकी आधार क्रमांक देखील टाकावा लागेल. तुमच्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास, तुम्हाला 16 अंकी आभासी ओळख क्रमांक (VID)टाकावा लागेल.

  • एकदा आपण ति प्रक्रिया पूर्ण केळल्यानंतर, आपल्याला सुरक्षा कोड प्रविष्ट करावा लागेल.

  • त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

  • त्यानंतर OTPटाका आणि 'Verify And Download' वर क्लिक करा.

  • यानंतर तुमहाला आधार रीप्रिंट करण्यापूर्वी ''प्रिव्ह्यू आधार लेटर' ची स्क्रीन दिसेल. तुमचे तपशील दोनदा तपासा.

  • आता तुम्हाला पेमेंट पर्याय निवडावा लागेल आणि आता तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी तुमची डिजिटल स्वाक्षरी सबमीट करावी लागेल.

  • एकदा तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com