'जरा थांबा', उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर...

उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर रिजर्व्हेशनची (Reservation) कमतरता भासू शकते.
Railways
RailwaysDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर रिजर्व्हेशनची कमतरता भासू शकते. तिकीट काढण्यात अडचण येईल. वास्तविक, कोळसा वाहतुकीसाठी गाड्यांच्या सुमारे 1100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मालगाडीला ट्रॅक रिकामा मिळाला, तर ट्रेन लवकर पोहोचेल. रेल्वेने (Railways) रद्द केलेल्या गाड्यांची संख्या वाढवली आहे. 24 मे पर्यंत सुमारे 1100 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मेल एक्सप्रेसच्या 500 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी गाड्यांच्या 580 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तर आणि एसईसीआर झोनच्या गाड्यांचा समावेश आहे. कोळशाचा (Coal) योग्य पुरवठा व्हावा आणि विजेची कमतरता भासू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय रेल्वेने सुमारे 650 गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. कालांतराने रेल्वे गाड्यांच्या रद्द फेऱ्यांची संख्या वाढत आहे. (If you are planning to go out for summer vacation, there may be a shortage of train reservations)

Railways
Railway Job 2022: रेल्वेत 10वी पाससाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

दरम्यान, रेल्वेने आपल्या 86 टक्के खुल्या वॅगन्स विविध पॉवर प्लांट्समध्ये कोळशाच्या वाहतुकीसाठी तैनात केल्या आहेत. देशातील वीज संकटाचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वे अधिकारी म्हणाले की, रेल्वे आपल्या 1,31,403 बॉक्सएनच्या ताफ्यांपैकी 1,13,880 कोळशाची वाहतूक करण्यासाठी वॅगन्सचा वापर करत आहे. कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयाशी सल्लामसलत करुन रेल्वेने तयार केलेल्या योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेकडे सुमारे 3,82,562 वॅगन आहेत, त्यापैकी 1,31,403 खुल्या वॅगन आहेत. त्यापैकीही 3,636 ची 2 मे पर्यंत दुरुस्ती करणे आवश्यक होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com