HDFC बँकेनंतर आता आणखी एका खाजगी बँकेने करोडो ग्राहकांना खुशखबर दिली आहे. पूर्वी ही बँक सरकारी होती पण आता ती खाजगी बँक झाली आहे. ती बॅंक म्हणजे IDBI बँक. IDBI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. त्यानंतर आता एफडी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. व्याजदरातील बदल 20 एप्रिलपासून लागू होणार आहे. (IDBI Bank changes interest rates on deposits)
किमान व्याज दर 2.70 टक्के
बदलानंतर, IDBI बँक 6 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.70 टक्के ते 5.60 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही एफडी ठेवींवरील व्याजात वाढ केली आहे.
IDBI बँकेने 7 दिवसांपासून 30 दिवसांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांच्या ठेवींवर 2.7 टक्के पहिला व्याजदर कायम ठेवला आहे. 31 दिवस ते 45 दिवस या कालावधीत आता 2.80 टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज मिळेल. माहितीनुसार, आयडीबीआय बँकेची ग्राहक संख्या सुमारे 3 कोटी आहे. पूर्वी ही बँक अर्ध सरकारी होती, जी आता पूर्णपणे खाजगी झाली आहे.
IDBI बँक FD व्याजदर नवीन व्याजदर खालीलप्रमाणे :
दिवस 07-14: 2.7 टक्के
15-30 दिवस: 2.7 टक्के
31-45 दिवस: 3 टक्के
46-60 दिवस: 3.25 टक्के
61-90 दिवस: 3.4 टक्के 3.9
91 दिवस ते 6 महिने: 3.75 टक्के
6 महिने ते 270 दिवस: 4.4%
271 दिवसांपासून ते 1पेक्षा कमी : 4.5 टक्के
1 वर्षासाठी : 5.15 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षे: 5.25 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे: 5.35 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे: 5.5 टक्के
5 वर्षांसाठी: 5.6%
5 वर्षे ते 7 वर्षे: 5.6%
7 वर्षे ते 10 वर्षे: 5.5 टक्के
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.