Sameer Panditrao
राज्यातील धरणे आषाढात पूर्ण भरू लागली आहेत.
जलसंपदा खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, धरणे ७५ टक्क्यांहून अधिक क्षमतेने भरली आहेत.
केवळ आमठाणे धरणाचा चक्राकार दरवाजा हा नादुरुस्त झाल्याने त्या धरणात पाणी साठवण्यात आलेले नाही.
साळावली धरण पूर्णपणे भरून वाहू लागले असले तरी संकेतस्थळावर ४१.१५ मीटर उंचीच्या जलाशयात आज ४२.४० मीटरपर्यंत पाणी असल्याची नोंद आहे.
तिळारी धरणाच्या कमाल ११३.२० मीटर उंचीच्या जलाशयात ८७.६० मीटर उंचीपर्यंत पाणी आहे. अंजुणे धरणात ९३.२० मीटरपैकी ७४.४५ मीटर पाणीसाठा आहे.
चापोली धरणात ३८.७५ मीटर उंचीपैकी ३५.६५ मीटर उंचीपर्यंत जलसाठा आहे.
पंचवाडी धरणात २६ मीटरपैकी २०.९२ मीटर उंचीपर्यंत तर गावणे धरणाच्या ६३.५० मीटर उंचीच्या जलाशयात ६१.७१ मीटरपर्यंत पाणी आहे.