व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स आणत असतो. पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक नवे फीचर आणले आहे. पण या फीचरचा वापर सगळ्यांचा करता येणार नाही. कारण हे सध्या फक्त व्हॉट्सअॅप बिटा वापकर्त्यासाठी आहे.
एका अहवालानुसार व्हॉट्सअॅपने (Whats App) आयओएस बिटा व्हर्जनमध्ये हे फीचर टाकले आहे. हे 22. 2.72 अपडेट आयओएस आवृत्तीमध्ये उपलब्ध असेल. यासाठी युजर्सला सेटिंगमध्ये जाऊन मॅनेज नोटिफिकेशन्समध्ये जाऊन ते ऑन करावे लागेल. याच्या डिझाईनमध्ये बदल केल आहे. मेसेज रिअॅक्शन फीचर्स युजर्स कोणत्याही एका मॅसेजवर काही इमोजीचे ऑप्शन पाठवण्याचा पर्याय देईल, जे वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करतील.
व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर आईओएस बीटा वर्जन आले आहे. याची काही टेस्ट केल्यानंतर ते वापरात येईल. प्रथम ते आईओएस युजर्ससाठी स्टेबल वर्जन प्रसिद्ध केले जाईल किंवा अद्याप ऍडराॅईडवर याबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही. हे फीचर वापरण्यासाठी युजर्सला व्हॉट्सअॅप बीटा सेटिंगमध्ये जावे लागेल, तेथून त्यांना रिएक्शन नोटिफिकेशनवर क्लिक करावे लागेल. यानंतर युजर्स रिएक्शन मॅसेजचा लाभ घेउ शकतात. या फीचरचा लाभ घेण्यासाठी दोन्ही मोबाइल (Mobile) युजर्सने ही सेटिंग केलेली असावी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.