Honda Bike Launch: हार्ले-डेव्हिडसनला टक्कर देणारी 'ही' बाईक भारतात लॉन्च; स्पोर्टी लूक, पॉवरफुल इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स

Rebel 500 Launch 2025: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतात त्यांची नवीन क्रूझर बाईक Rebel 500 लॉन्च केली. या स्टायलिश आणि शक्तिशाली बाईकची बुकिंग बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर सुरु झाली आहे.
Rebel 500 Launch 2025
Rebel 500 Launch 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतात त्यांची नवीन क्रूझर बाईक Rebel 500 लॉन्च केली. या स्टायलिश आणि शक्तिशाली बाईकची बुकिंग बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर सुरु झाली आहे. चला तर मग या क्रूझर बाईकमध्ये कोणते फीचर्स आहेत? त्याची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत किती? याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

इंजिन आणि पॉवर

होंडा रिबेल 500 मध्ये 471 सीसी लिक्विड-कूल्ड, इनलाइन-2 इंजिन आहे, जे 46 हॉर्सपॉवर आणि 43.3 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आले आहेत. तसेच, 16-इंचाचे व्हील बेस दिले आहेत.

Rebel 500 Launch 2025
Bajaj Bike Launch: स्टाईल अन् मायलेजचा कॉम्बो पॅक! बजाजची 'ही' धाकड बाईक लॉन्च, स्प्लेंडरला देणार टक्कर; जाणून घ्या किंमत

बाईकचा लूक आणि फीचर्स

रिबेल 500 मध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस, निगेटिव्ह एलसीडी डिस्प्ले आणि ट्यूबलर स्टील फ्रेमसह ब्रेकिंग सिस्टम आहे. बाईकच्या सीटची उंची 690 मिमी असून जी रायडरसाठी आरामदायी आहे. तथापि, 11.2-लिटर इंधन टाकी बाईकच्या आकाराच्या तुलनेत थोडी लहान आहे. या क्रूझर बाईकचा लूक ब्लॅक-आउट थीमसह शानदार आहे. फोर्क सस्पेंशन, कास्ट अ‍ॅल्युमिनियम व्हील्स, स्लिपर क्लच असिस्ट, डाय-कास्ट अ‍ॅल्युमिनियम सब-फ्रेम आणि नवीन डिझाइन केलेले फेंडर्स आहेत. होंडाचे म्हणणे आहे की, बाईकसोबत अनेक अधिकृत अ‍ॅक्सेसरीज देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे तिचा लूक आणि परफॉर्मन्स आणखी सुधारेल.

Rebel 500 Launch 2025
Honda E-Clutch Bike: गिअर बदलण्याची झंझट संपली! होंडाची नवी ई-क्लच बाईक मार्केटमध्ये दाखल; किंमत व फीचर्स जाणून घ्या

बाईकमध्ये खास काय आहे?

आकर्षक डिझाइन, शक्तिशाली इंजिन आणि प्रीमियम फीचर्ससह होंडा रिबेल 500 ही क्रूझर बाईक प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. ही बाईक स्टाईल आणि रायडिंग प्रेमींना नक्कीच आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com