Honda Elevate Launching: Honda ने दिलेल्या माहितीनुसार Elevate ला हायब्रीड पॉवरट्रेनसह लाँच केले जाणार नाही. त्याऐवजी, कंपनी पुढील दोन ते तीन वर्षात ते ईव्ही म्हणून लाँच करणार आहे.
होंडा सध्या आपल्या 'सिटी' गाड्यांमध्ये हायब्रिड पॉवरट्रेन देत आहे. यानंतर होंडा एलिव्हेट गाड्यांमध्येही अशाच प्रकारचं पॉवरट्रेन देईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, याऐवजी आता एलिव्हेटमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे, आणि त्यानंतर होंडा या गाडीचं इलेक्ट्रिक व्हेरियंट लाँच करेल. अर्थात, भविष्यात होंडा एकापेक्षा जास्त हायब्रिड कार लाँच करणार आहे.
होंडाने आश्वासन दिले आहे की कंपनी दरवर्षी इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि एक हायब्रीड कार लाँच करणार आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही एलिव्हेटवर आधारित असेल, तर हायब्रीड प्रीमियम एसयूव्ही प्रमाणे एलिव्हेटच्या वरचे प्रीमियम उत्पादन असू शकते.
होंडा प्रीमियम SUV सारख्या विभागात पुनरागमन करू शकते, जी CR-V च्या निर्गमनानंतर रिक्त झाली आहे. त्यामुळे कंपनीला नवीन उत्पादनासह नवीन CR-V परत आणण्याची संधी आहे.
त्यामुळे, एलिव्हेटनंतर, पुढील वर्षापासून होंडाकडून दरवर्षी एक नवीन कार घेऊन अधिक प्रोडक्टची अपेक्षा आहे. पुढील लॉन्च प्रीमियम हायब्रीड असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
कंपनी पहिल्यांदाच कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. Elevate कार सप्टेंबरच्या सुरुवातीला बाजारात लाँच केली जाईल. Elevate Honda चे एकमेव 1.5L पेट्रोल इंजिन आणि स्टँडर्ड CVT मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह लाँच केली जाणार आहे. होंडाकडे सध्या 'अमेझ' आणि 'सिटी' कार आहे. त्यामुळेच आता एसयूव्हीमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.