रशिया-युक्रेन युद्धामुळे तुमचा EMI वाढणार!

जर तुम्ही घर घेण्याच्या तयारीत असाल तर गृहकर्ज घेण्याची यापेक्षा चांगली संधी नाही हे समजून घ्या. स्वस्त व्याजाची संधी आणखी काही दिवसच उपलब्ध असेल हेही समजून घ्या.
Indian Money
Indian MoneyDainik Gomantak

तुम्हीही तुमचे स्वप्न साकार करण्याचा विचार करत असाल तर त्वरा करा. कारण स्वस्त व्याजदराचे दिवस लवकरच संपणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकांवर व्याजदर वाढवण्याचा दबाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. आरबीआय एप्रिलमध्ये रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये बदल सुरू करण्याची शक्यता आहे. सध्या गृहकर्जाचे व्याजदर गेल्या 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गेल्या दोन वर्षांपासून व्याजदर वाढीवर नियंत्रण ठेवले आहे.

Indian Money
फेसबुकने युक्रेनसाठी जारी केले 'हे' खास फीचर

आरबीआय एप्रिल किंवा जूनमध्ये व्याजदर वाढवू शकते. चलनवाढ आणि इतर व्यापक आर्थिक परिस्थितीमुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर (Loan) वाढवण्याचा दबाव वाढत आहे. त्यामुळे जर तुम्ही घर घेण्याच्या तयारीत असाल तर गृहकर्ज घेण्याची यापेक्षा चांगली संधी नाही हे समजून घ्या. स्वस्त व्याजाची संधी आणखी काही दिवसच उपलब्ध असेल हेही समजून घ्या.

परदेशी बाजारात क्रूडची किंमत 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. ब्रेंट क्रूडने (Crude Oil) प्रति बॅरल 100 डॉलर्स ओलांडले आहेत. जर हे युद्ध आणखी वाढले तर तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल आणि अल्पावधीत क्रूड प्रति बॅरल $105 पर्यंत पोहोचू शकेल. कारण पुरवठ्याबाबत चिंता आहे. ही समस्या आणखी वाढू शकते.

क्रूडच्या किमतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत आहे. भारत क्रूड आयात (Import) करतो त्यामुळे त्यांचे आयात बिल वाढेल, आणि ताळेबंद खराब होईल. या देशांचे चालू खाते आणि वित्तीय तूट वाढेल. या देशांचे चलन कमजोर होईल. यामुळे या देशांमध्ये महागाई वाढण्याचा धोकाही वाढेल.

भारत हा सर्वात मोठा क्रूड खरेदीदार आहे. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. क्रूडची किंमत 100 डॉलरच्या वर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलही महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढेल.

अशा स्थितीत सेंट्रल बँकेकडे व्याजदर वाढवणे हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे बँका गृहकर्जाचे व्याजदरही वाढवू शकतात. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे

कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त गृहकर्ज

नवीनतम दर पाहता, HSBC बँक फक्त 6.45% व्याज दराने सर्वात स्वस्त कर्ज देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफ बडोदा सर्वात स्वस्त दराने 6.5% कर्ज देत आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडिया (SBI) मध्ये किमान 6.70% व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते. सर्वात स्वस्त कर्ज पाहण्याआधी, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की वेगवेगळ्या बँकांचे प्रक्रिया दर वेगवेगळे आहेत.

त्यामुळे कर्ज घेण्याची किंमत किती आहे याचाही विचार करावा. यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या वेबसाइटवर जाऊन किंवा थेट बँकेच्या शाखेत जाऊन माहिती मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com