Gold Price: सोन्याची ऐतिहासिक झेप! दराने रचला इतिहास; एक तोळा सोने आता 'या' किंमतीला...

वर्षभरात सोन्याच्या दरात 20 टक्क्यांहून अधिक भाववाढ
Gold Price
Gold PriceDainik Gomantak

Gold Price: सोन्याच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 62,000 रुपये प्रति एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅमवर पोहचल्या आहेत. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात 940 रुपयांची उसळी पाहायला मिळाली. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

Gold Price
Nitishkumar on Goa CM: नितीशकुमार यांचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे; दिला 'हा' सल्ला...

केवळ सराफा बाजारातच नाही तर कमोडिटी एक्स्चेंज एमसीएक्सवरही सोन्याच्या दरांनी विक्रमी उसळी घेतली. MCX वर सोन्याचा भाव 1.26 टक्क्यांनी वाढून 768 रुपये झाला आहे आणि किंमत 61,733 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी झाली आहे.

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदीचा भावही 660 रुपयांनी वाढून 76,700 रुपये किलो झाला, तर एमसीएक्सवर चांदी 961 रुपयांच्या उसळीसह 76,361 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

यूएस फेडरल बँकेने बुधवारी व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवले. आणि फेडने सूचित केले आहे की पुढील फेड बैठकीत कठोर आर्थिक धोरणावर बंदी घातली जाऊ शकते. रोखे उत्पन्नात घट झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परदेशी बाजारातही सोन्याचा भाव 2,039.50 डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव 25.50 डॉलर प्रति औंस झाला

Gold Price
Bilawal Bhutto India Visit: बिलावल यांचं आजोळ आणि गोव्याचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये? पाकिस्तानमध्ये आहे गोमंतकीयांची वस्ती...

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चांगल्या परताव्याच्या आशेने ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळत आहे. पण ज्यांची लग्ने आहेत, त्यांचा खिसा कापला जाणार आहे.

2013 मध्ये सोन्याचा दर 29000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि अवघ्या 10 वर्षात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 33000 रुपयांनी वाढला आहे. 10 वर्षात सोन्याच्या किमतीत 113 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com