Hero Maverick X440 होणार 23 जानेवारीला लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Hero Maverick X440 Launch: अलीकडेच कंपनीने या रोडस्टरचा पहिला अधिकृत टीझर रिलीज केला, ज्यामध्ये सिल्हूट आणि त्याच्या डिझाइनची झलक दिली आहे.
Hero Maverick X440
Hero Maverick X440X, Hero Motocorp
Published on
Updated on

Hero Maverick X440 will be launched on January 23, know the price and features:

देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp आपली नवीन मोटरसायकल Maverick X440 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी ही Maverick X440 मोटरसायकल 23 जानेवारीला बाजारात आणणार आहे.

अलीकडेच कंपनीने या रोडस्टरचा पहिला अधिकृत टीझर रिलीज केला, ज्यामध्ये सिल्हूट आणि त्याच्या डिझाइनची झलक दिली आहे. आता कंपनीने आपल्या एक्झॉस्ट नोटसह काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

हिरो मॅव्हरिक बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. ही मोटरसायकल कंपनीसाठीही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे, कारण हीरो प्रथमच प्रीमियम मोटरसायकल विभागात प्रवेश करत आहे.

ही मोटरसायकल किती खास असेल?

Maverick 440 ही रोडस्टरसारखी दिसते. नुकताच समोर आलेला टीझर दाखवतो की त्यात एच-आकाराचे डेटाइम रनिंग लॅम्प आहेत. याशिवाय, यात नवीन एलईडी हेडलॅम्प, ऑफसेट गोलाकार इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल-पीस ट्यूबलर हँडलबार आणि टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत.

याशिवाय एलईडी टर्न इंडिकेटर, डायमंड-कट अलॉय व्हील आणि एक्झॉस्ट सिस्टीम देखील यामध्ये दिसत आहे.

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे अनेक नवे फीचर्स यामध्ये दिले जाऊ शकतात.

Hero Maverick X440
Share Market कोसळत असतानाही 'हा' सरकारी शेअर्स करतोय जादू, गाठली 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी

तथापि, Hero MotoCorp ने अद्याप आपल्या नवीन Hero Maverick 440 2024 चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स जाहीर केलेली नाहीत.

त्याच वेळी, एका अहवालात म्हटले आहे की ही, नवीन हीरो मोटरसायकल कदाचित या विभागात अधिक शक्तिशाली आणि स्पर्धात्मक असेल. ही बाईक भारतीय बाजारपेठेत मिड-कॅसिटी सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.

Hero Maverick X440
Tata Punch: 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी, 315 किमी रेंज आणि आकर्षक किंमत; देशातील सर्वात छोटी EV SUV लॉन्च

इंजिन

Maverick 440 मध्ये 440 cc सिंगल-सिलेंडर ऑइल-कूल्ड इंजिन आहे. ते 27 bhp कमाल पॉवर आणि 38 Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

किंमत

Maverick 23 जानेवारी 2024 रोजी जवळपास 2 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com