HDFC बँक देणारा छोट्या व्यावसायिकांना कर्ज, जाणून घ्या

HDFC बँकेने भारतातील छोट्या व्यवसायांनाप्रोत्साहन देण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर ही क्रेडिट सुविधा सुरू केली आहे .
HDFC bank will provide loan & credit facility to small businesses
HDFC bank will provide loan & credit facility to small businesses Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील अग्रगण्य असणाऱ्या HDFC बँकेने मास्टरकार्ड (Master Card), यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने भारतातील छोट्या व्यवसायांना (Startup's) प्रोत्साहन देण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर ही क्रेडिट सुविधा सुरू केली आहे . यामुळे बँकांना डिजीटल करण्यात आणि कोरोना सारख्या महमरीतुन सावरण्यास मदत होईल. यामध्ये, विशेषतः महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना मदत केली जाणार असल्याचे बँकेकडाऊन सांगण्यात आले आहे. (HDFC bank will provide loan & credit facility to small businesses)

या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना कार्यरत भांडवली कर्ज दिली जातील, आणि त्यांना डिजिटलायझेशन आणि साथीच्या आजारातून सावरण्यासाठी आर्थिक मदतही मिळेल . एचडीएफसी बँकेने मंगळवारी याबाबत संयुक्त निवेदन जारी करत म्हटले आहे की ही सुविधा केवळ नवीन क्रेडिट ग्राहकांनाच उपलब्ध असेल. यात एक लक्ष्य देखील असेल की किमान 50 टक्के महिला उद्योजकांना याच्यामध्ये मदत करता येईल.

याबाबत बोलताना एचडीएफसी बँकेने सांगितले की, मास्टरकार्ड, यूएसएआयडी आणि यूएसआयडीएफसी यांच्याशी हातमिळवणी केल्याचा बँकेला अभिमान आहे. त्यांनी सांगितले की ते छोट्या व्यवसायांना पाठिंबा देतील, जे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि साथीच्या रोगाने त्यांचे जीवन आणि व्यवसाय प्रभावित केले आहेत. ते म्हणाले की ही भागीदारी केवळ क्रेडिट सुविधा पुरवण्यास मदत करणार नाही. यासह, तो व्यवसायाचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन करण्यात मदत आणि सल्ला देखील देतील. युएसएआयडीने म्हटले आहे की, साथीच्या आजाराने महिलांवर वाईट परिणाम झाला आहे. ते म्हणाले की त्यांनी आर्थिक अडचणींना तोंड दिले आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंब आणि समाजाच्या जीवनावर झाला आहे.

HDFC bank will provide loan & credit facility to small businesses
तुमचा फोन हरवला? Google Pay, Paytm अन् इतर खाती कशी ब्लॉक कराल; वाचा

एचडीएफसी बँकेचा सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा हा 17.6 टक्क्यांनी वाढला आहे. आणि आता कंपनीचा निव्वळ नफा 8,834.30 कोटी रुपये झाला आहे.वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत कंपनीचा नफा 7,513.11 कोटी रुपये होता. तथापि, तज्ञांनी यापेक्षा जास्त नफ्याचा अंदाज वर्तवला होता. एचडीएफसी बँकेने सांगितले की तिमाहीत तिचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 12.1 टक्क्यांनी वाढून 17,684.40 कोटी रुपये झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com