Vadhavan Port Project: मोदी सरकारचा मेगा प्लॅन, 76000 कोटी खर्च करुन बांधणार नवे पोर्ट; 12 लाख रोजगाराचा दावा

Jawaharlal Nehru Port Authority: महाराष्ट्रातील पालघरमधील वाधवन बंदराला सरकारने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 76200 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
Vadhavan Port Project
Vadhavan Port ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Maritime Board: लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळवून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे, सत्ता स्थापनेनंतर लगेच पंतप्रधानांनी महत्त्वाचे निर्णयही घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने प्रयत्नरत आहे.

यातच आता, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात नवीन बंदर बांधण्यासाठी सरकार येत्या 5 वर्षात 76 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

वास्तविक, महाराष्ट्रातील पालघरमधील वाधवन बंदराला सरकारने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 76200 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. वाधवन बंदरातील कंटेनरची क्षमता 20 दशलक्ष टीईयू असेल. यामुळे बंदराच्या आसपासच्या परिसरात 12 लाख रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

Vadhavan Port Project
PM-Kisan 17th installment: 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट; मोदींनी पीएम किसानचा 17 वा हप्ता केला जारी

रेल्वे आणि विमानतळ कनेक्टिव्हिटी

दरम्यान, या बंदराभोवती रेल्वे आणि विमानतळाची उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी असेल. देशातील एका मोठ्या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 9 कंटेनर टर्मिनल आणि एक मेगा कंटेनर पोर्ट असेल. या बंदराचा पहिला टप्पा 2029 मध्ये पूर्ण होईल. हे बंदर जगातील टॉप 10 मध्ये असेल. हे मुंबईपासून (Mumbai) सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे.

डिझाइन असे असेल

तसेच, या बंदराच्या उभारणीसाठी प्रत्येक संबंधितांशी चर्चा करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. बंदराच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून आता ते स्थानिक लोकांच्या हितासाठी तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे बंदर भारत मिडल ईस्ट कॉरिडॉरसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या बंदरावर कोस्ट गार्डचा स्वतंत्र बर्थ असेल. याशिवाय, इंधन बर्थ देखील असेल. वृत्तानुसार, हे बंदर जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण (JNPT) आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे संयुक्तपणे बांधणार आहेत, यामध्ये जेएनपीटीचा 74 टक्के तर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचा 26 टक्के हिस्सा असणार आहे.

Vadhavan Port Project
PM Kisan Scheme: PM मोदींनी 8 कोटी शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी... जारी केला 15 वा हप्ता

12 लाख रोजगार संधी

शिवाय, हे बंदर भारत (India) मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉरच्या माध्यमातून व्यापारातही उपयुक्त ठरेल. सरकारला आशा आहे की, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमात या बंदराचा समावेश झाल्यानंतर, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बारा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Vadhavan Port Project
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता मिळणार | Gomantak Tv

वाधवन हे जगातील दहावे मोठे बंदर असेल

वाधवन बंदर हे जगातील दहावे मोठे बंदर असेल. 23 दशलक्ष ट्वेंटी-फूट इक्विव्हलंट युनिट्स (TEU) किंवा 254 दशलक्ष टन वार्षिक कार्गो हाताळण्याची त्याची क्षमता असेल. 2035 पर्यंत पूर्णतः तयार झाल्यावर, वाधवन बंदर हे दीनदयाल बंदर, मुंद्रा आणि विशाखापट्टणम बंदरानंतर भारतातील चौथे मोठे बंदर असेल. वाधवन बंदर 16,000-25,000 TEU क्षमतेच्या कंटेनर जहाजांची वाहतूक सक्षम करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com