Budget 2023: पीएफ खातेदार अनेक दिवसांपासून व्याजदराचे पैसे मिळण्याची वाट पाहत आहेत. पीएफ खातेधारकांना अपेक्षा होती की, डिसेंबर 2022 मध्ये त्यांचे पैसे येतील, परंतु तसे झाले नाही. त्यानंतर ही रक्कम अर्थसंकल्प-2023 सादर होण्याआधी येईल, अशी खातेदारांना अपेक्षा होती, मात्र तरीही तसे झाले नाही.
त्याचवेळी, ही बातमी समोर येत आहे की, होळीपूर्वी, सरकार पीएफ खातेधारकांना एक मोठी भेट देऊ शकते, जिथे ते खातेदारांना पीएफ व्याजदराचे (Interest Rate) पैसे सुपूर्द करु शकते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पीएफच्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती, तेथून असे समजले की, सरकार या क्षेत्राची देखील चांगली काळजी घेत आहे.
त्याचवेळी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, सरकार होळीपूर्वी पीएफ खातेदारांना ही आनंदाची बातमी देऊ शकते, जिथे त्यांचा विशेष लाभ देशभरातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
दुसरीकडे, जर सरकारने तुमचे पैसे होळीसाठी पाठवले, तर ते तपासण्यासाठी, तुम्ही EPFOHO UAN ENG लिहून 7738299899 वर एसएमएस करुन पाठवू शकता, त्यानंतर तुम्हाला उत्तरावर बॅलन्सची माहिती मिळेल. यासोबतच उमंग अॅप या वेबसाइटवरुनही तुम्ही ते तपासू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.