दिवसाला दोन रुपये गुंतवा अन् महिन्याला मिळवा 3000 रुपये पेन्शन

असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) सुरु करण्यात आली आहे.
Government launches Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana
Government launches Pradhan Mantri Shram Yogi Mandhan YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही कल्पना नक्कीच येते की ते म्हातारपणात आपला खर्च कसा करणार . पगारदार लोकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन (Pension) सुविधेचा लाभ मिळतो, जेणेकरून वृद्धापकाळातही त्यांचा खर्च व्यवस्थितपणे चालू शकतो . पण असंघटित क्षेत्रातील कामगारांना अशी कोणतीही सुविधा नाही.असंघटित क्षेत्रातील लोकांची ही समस्या दूर करण्याच्या तसेच त्यांना पेन्शन सुविधेचा लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शनही मिळणार आहे.(Government launches Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana)

काय आहे ही योजना-

असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत, असंघटित क्षेत्रातील कामगार जसे चालक, रिक्षा चालक, मोची, शिंपी, मजूर, घरगुती नोकर, वीटभट्टी कामगार इत्यादी, ज्यांचे मासिक उत्पन्न 15000 किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

ही योजना 15 फेब्रुवारी 2019 रोजी लागू करण्यात आली होती . या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त सरकारी कर्मचारी, कर्मचारी भविष्य निधी (EPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य (ESIC) या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच, या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती आयकर भरणारी नसली पाहिजे.

Government launches Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana
LIC ची ही योजना आयुष्यभर करेल मालामाल, जाणून घ्या फायदे

किती गुंतवणूक करावी लागेल -

या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 55 ते 200 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, आपल्याला आपल्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा डिजिटल सेवा केंद्रात जावे लागेल. यासह, नोंदणीसाठी, बँक खाते पासबुक आणि आधार कार्ड देखील आपल्यासोबत ठेवावे लागेल.

या योजनेत गुंतवणूक करून, वयाच्या 60 वर्षांनंतर, तुम्हाला दरमहा 3000 रुपये मासिक पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com