Export Tax On Rice: परदेशात तांदूळ एक्यपोर्ट करणे झाले महाग, सरकारने लावला निर्यात कर

सरकारने काही विशिष्ट जातींच्या गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात कर लावला आहे.
Export Tax On Rice
Export Tax On RiceDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील तांदळाच्या वाढत्या किमती आणि धानाची पेरणी कमी झाल्यानंतर उत्पादनात घट होण्याची भीती आहे. यामुळे सरकारने तांदळाच्या निर्यातीवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर कर लावला आहे. परदेशात तांदूळ निर्यातीवर 20 टक्के निर्यात शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे आता परदेशात तांदूळ पाठवणे महाग होणार आहे. (Export Tax On Rice)

सरकारने गैरबासमती तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात कर लावला आहे. या दिवसांत तांदळाची निर्यात वाढली होती. हे रोखण्यासाठी सरकारने तांदळाच्या निर्यातीवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 9 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाने ही माहिती दिली आहे.

Export Tax On Rice
Low Budget Smartphones : स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी? मग हे 2 पर्याय नक्की पहा

प्रत्यक्षात अन्न पुरवठा मंत्रालयाच्या शिफारशींनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. PDS आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी पुरेसा साठा ठेवण्यासाठी अन्न पुरवठा मंत्रालयाने तांदळाच्या निर्यातीवर कर लादण्याचा सल्ला दिला होता.

देशातील अनेक भागात पावसाअभावी भात पेरणीवर परिणाम झाला असून, त्यामुळे यंदा भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळे गव्हाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. गव्हाच्या किमतीमुळे मैदा व त्याचे पदार्थ महागले, त्यामुळे महागाई वाढली.

आता या महागाईच्या युगात तांदळाचे संकट येऊ शकते. ज्याचा सामना संपूर्ण जगाला करावा लागू शकतो. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाअभावी भात पेरणीचे प्रमाण घटले आहे. संपूर्ण जगामध्ये तांदळाच्या एकूण व्यापारापैकी 40 टक्के वाटा भारताचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com