Alert! 348 मोबाईल अ‍ॅप्सवर केंद्र सरकारने घातली बंदी, चीन पाठवत होता डेटा

केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की चीन आणि इतर देशांनी विकसित केलेल्या अशा 348 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
Central Government Has Banned 348 Mobile Apps
Central Government Has Banned 348 Mobile AppsDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने (Central Government) बुधवारी सांगितले की चीन आणि इतर देशांनी विकसित केलेल्या अशा 348 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे जी वापरकर्त्यांची सर्व माहिती गोळा करत होती आणि ती देशाबाहेरील सर्व्हरवर अनधिकृतपणे पाठवत होते असे समोर आले आहे. (The government has banned 348 mobile apps for sending data of Indian users to China)

Central Government Has Banned 348 Mobile Apps
National Herald Case: यंग इंडियाचे कार्यालय ईडीने केले सील

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत रोडमल नगरच्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली आहे. देशाबाहेर माहिती पाठवणारे कोणतेही अ‍ॅपला सरकारने ओळखले आहे का आणि असे कोणतेही अ‍ॅप आढळल्यास त्यावर बंदी घालण्यात आली आहे का, असा प्रश्न सदस्याने यावेळी विचारला होता.

उत्तरात, मंत्री म्हणाले की केंद्रीय गृह मंत्रालयाने अशा 348 अ‍ॅप्सची ओळख पटवली आहे आणि मंत्रालयाच्या विनंतीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे सर्व अ‍ॅप ब्लॉक केले आहेत कारण असे डेटा ट्रान्समिशन हे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता तसेच राज्याचे संरक्षण आणि सुरक्षा यांचे उल्लंघन करते. पुढे चंद्रशेखर म्हणाले की, हे अ‍ॅप्स चीनसह विविध देशांनी विकसित केले आहेत.

Central Government Has Banned 348 Mobile Apps
Azadi Ka Amrit Mahotsav: केंद्राचा मोठा निर्णय! 15 ऑगस्टपर्यंत स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश

तसेच अलीकडेच गेमिंग दिग्गज क्राफ्टनचा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम, बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI) देखील Play Store वरून काढून टाकण्यात आला आहे. यासंदर्भात सरकारकडून आदेश प्राप्त झाला असून त्यामुळेच अ‍ॅपचा प्रवेश ब्लॉक करण्यात आल्याचे गुगलने यावेळी म्हटले आहे.

तसेच सप्टेंबर 2020 मध्ये, डेटा सुरक्षिततेचा हवाला देत Krafton's Player Unknown Battlegrounds (PUBG) वर 117 इतर चीनी अ‍ॅप्ससह बंदी घालण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com