Government Subsidy: सरकारकडून सबसिडी का दिली जातेय माहितीये का? सरकारचा हेतू...

Subsidy In India: सरकारकडून जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदे मिळतात.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Subsidy In India: सरकारकडून जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदे मिळतात.

तर दुसरीकडे, सरकारकडून प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत.

यासोबतच सरकार लोकांना सबसिडीही देते. कमी किमतीत अनेक वस्तू मिळवून लोक या सबसिडीचा लाभ घेऊ शकतात. जरी असे बरेच लोक आहेत, ज्यांना सबसिडीबद्दल फारशी माहिती नाही, चला तर त्याबद्दल जाणून घेऊया...

सबसिडी

सबसिडी म्हणजे सरकारकडून (Government) संस्थेला पैसे हस्तांतरित करणे. त्यामुळे अनुदानित उत्पादनाच्या किमतीत घसरण होते. सबसिडीचा उद्देश समाजाचे कल्याण करणे हा असतो. हा सरकारच्या योजनेत्तर खर्चाचा एक भाग आहे. देशातील प्रमुख सबसिडी म्हणजे पेट्रोलियम सबसिडी, खत सबसिडी, खाद्य सबसिडी, व्याज सबसिडी इ.

PM Modi
Government Scheme: सरकारचा मोठा निर्णय, SCSS, सुकन्या योजनासह लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ

सबसिडीचा लाभ

समाजाच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सबसिडी देणे अत्यंत आवश्यक आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, अनेक महत्त्वाची उत्पादने सरकारकडून कमी किमतीत लोकांना उपलब्ध करुन दिली जातात.

PM Modi
Government Scheme: विवाहित महिलांसाठी खूशखबर! सरकार देणार एवढी मोठी रक्कम

लोकांना फायदा होतो

सबसिडी (Subsidy) ही व्यक्ती किंवा कंपन्यांना दिलेली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देय असते, जी सामान्यत: सरकारकडून रोख पेमेंट किंवा लक्ष्यित कर कपातीच्या स्वरुपात मिळवली जाते.

सध्या लोकांना गॅस सिलिंडरही अनुदानित दरात मिळतात. मात्र, यावर सरकारने सबसिडी दिली नाही तर त्याचा थेट परिणाम महागाईच्या स्वरुपात जाणवतो. अशा परिस्थितीत सरकार समाजहिताच्या उद्देशाने सबसिडी देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com