लोकांच्या हक्काची आणि विश्वसार्ह्य म्हणून LIC कडे पहिले जाते. विमा संरक्षण मिळण्यासाठी लोक प्रामुख्याने LIC ची निवड करतात. LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या लाभदायी पॉलिसी देत आलीय. LIC कडून ग्राहकांसाठी मोठी खुश खबर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा देखील मिळणार आहे. एलआईसीकडून धन वर्षा ही योजना राबवण्यात येतेय. या योजनेसंबंधी माहिती खालीलप्रमाणे:-
वयाचं बंधन नाही:-
एलआईसीकडून धन वर्षा ही योजना राबवण्यात येतेय. या योजनेमध्ये तुम्हाला जास्त पैशांची गुंतवणूक करायची गरज नाही. तुम्ही लहान वयापासून या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता. या योजनेमधून खूप चांगला परतावा मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फायदा तर मिळतोच शिवाय दीर्घकाळासाठी बचतसुद्धा करता येते. धन वर्षा योजना ही व्यक्तिगत बचत जीवन विमा योजना आहे. जर तुम्ही धन वर्षा योजनेमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर 3ऱ्या वर्षांपासून ही योजना तुम्ही निवडू शकता.
प्रीमियम विषयी:-
या योजनेसाठी तुम्ही कमी वयापासून गुंतवणूक करू शकता. LIC धन वर्षा पॉलिसी एक नॉन-पार्टिसिपेटिंग, पर्सनल, सिंगल प्रीमियम आणि सेव्हिंग बीमा योजना आहे. या योजनेसाठी एलआईसी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला या पॉलिसीसाठी अप्लाय करावं लागणार आहे.
या पॉलिसीसाठी तुम्हाला एकदाच प्रीमियम भरायचा आहे. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू जरी झाला तरी नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला विम्याची रक्कम मिळू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.