शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 11व्या हप्त्याबाबत नवीनतम आले अपडेट

पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने मोठी माहिती दिली आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून नववर्षाची भेट देण्यात आली. केंद्र सरकारने 1 जानेवारी रोजी पीएम किसानच्या 10व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात वर्ग केले. PM किसानचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही त्वरित तुमचा तपशील तपासावा. अन्यथा 11व्या हप्त्याचे पैसेही मिळणार नाहीत. पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 11व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने मोठी माहिती दिली आहे. (PM Kisan Yojana Latest News Update)

वार्षिक 6000 रुपये मिळवा

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. जे 3 हप्त्यांमध्ये दिले जाते. यामध्ये 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

10 कोटींहून अधिक लोकांकडे पैसे हस्तांतरित करण्यात आले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे एप्रिल महिन्यात जारी केले जाऊ शकतात. 1 जानेवारी 2022 रोजी, 10 व्या हप्त्याचे पैसे सरकारने 10.09 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले. सरकारने 20,900 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती.

PM Kisan Yojana
रंजक कारण देत NSC च्या माजी प्रमुखांनी दिला होता राजीनामा; वाचा काय आहे प्रकरण

याप्रमाणे स्टेटस तपासा

सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

या वेबसाईटच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

आता तुम्हाला लाभार्थी स्टेटस वर क्लिक करावे लागेल.

तुमचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक यासारखे सर्व तपशील भरावे लागतील.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण सूचीमध्ये आपले नाव तपासू शकता.

पैसे न मिळाल्यास या क्रमांकांवर तक्रार करा

पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com