Gold Silver Price Drop: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव थेट गेल्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर

Gold And Silver Price Crash Mcx Market: सोने-चांदी खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली.
Gold And Silver Price Crash Mcx Market
Gold Silver Price DropDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Gold And Silver Price Crash Mcx Market: सोने-चांदी खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. कमोडिटी मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री सोने-चांदीच्या किमती थेट गेल्या 12 महिन्यांतील म्हणजेच एका वर्षाच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एकाच झटक्यात चांदी तब्बल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक प्रति किलोने स्वस्त झाली, तर सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅममागे 4 हजार रुपयांपेक्षा जास्त मोठी घसरण नोंदवल गेली.

शुक्रवारी रात्री जवळपास 8 वाजता बाजाराचे चित्र अचानक पालटले आणि बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून आला. एमसीएक्सवर डिसेंबर फ्युचरची चांदी सुमारे 5 टक्क्यांनी घसरुन थेट 1,78,900 ते 1,79,000 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आली. तसेच, सोन्याचा भाव 3 टक्क्यांनी घसरुण 1,38,250 ते 1,38,400 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर आला.

Gold And Silver Price Crash Mcx Market
Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

सध्याच्या सराफा बाजारानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा (Gold) भाव 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर दागिन्यांसाठी वापरले जाणारे 22 कॅरेट सोने 1,28,000 रुपयांवर आले. याशिवाय, 18 कॅरेट सोने 1,05,000 रुपये आणि 999 शुद्धतेची चांदी 1,81,344 रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेड करत आहे.

Gold And Silver Price Crash Mcx Market
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या किमतीचा पुन्हा भडका! केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासूनच नवे दर लागू

किमतीत झालेल्या या अचानक मोठ्या घसरणीमागे प्रामुख्याने तीन महत्त्वाची कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीचे भाव उच्च पातळीवर असताना गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग केली. तसेच, अमेरिकेकडून जाहीर झालेले आर्थिक आकडे अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत आल्यामुळे अमेरिकन डॉलर आणि यूएस ट्रेजरी यील्डमध्ये मोठी मजबुती पाहायला मिळाली.

Gold And Silver Price Crash Mcx Market
Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

याशिवाय, अमेरिकन फेडरल रिजर्व्ह अधिकाऱ्यांनी व्याजदरांबाबत कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले. व्याजदर उच्च राहण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी सोने-चांदीमधून आपले पैसे काढून अधिक चांगला परतावा देणाऱ्या इतर सुरक्षित पर्यायांकडे वळवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ही घसरण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.