Diwali: धनत्रयोदशीला दागिन्यांची लयलूट! 25 हजार कोटी दागिन्यांची विक्री, 45 हजार कोटींचा व्यवसाय

दिवाळीच्या उरलेल्या दिवसांतही दागिने यासह इतर वस्तूंची विक्री वाढेल, अशी आशा देशभरातील व्यापाऱ्यांना आहे.
Diwali
DiwaliDanik Gomantak
Published on
Updated on

दिवाळीला साजरा केला जाणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे सण साजरा करण्यावर अनेक बंधने होती. दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. यावर्षी दिवाळीला धनत्रयोदशी निमित्त 25 हजार कोटी दागिन्यांची विक्री झाली असून, 45 हजार कोटींचा व्यवसाय झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Diwali
PM SVANidhi: कोणत्याही बँक हमीशिवाय सरकार देतंय कर्ज, असा करा अर्ज

एवढेच नव्हे तर, ऑटोमोबाईल्स, संगणक, फर्निचर आणि मिठाई यात 20 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. यामध्ये भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल वस्तू यांचा देखील समावेश आहे.

मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस देशभरात वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ग्राहकांची गर्दी कमी होती आता पुन्हा एकदा पूर्ण जल्लोषात ग्राहक बाजारात आले आहेत. अशी माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.

Diwali
Post Office Scheme: पोस्टाने आणली तुमच्या फायद्याची स्कीम, जाणून घ्या

सणासुदीच्या हंगामात वस्तू विक्रीचा आकडा 01 लाख 50 हजार कोटींच्या पुढे जाईल असा अंदाज कॅटने वर्तवला आहे. चीनला यंदा दिवाळीशी संबंधित वस्तूंचे 75 हजार कोटींहून अधिक नुकसान होणार आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये भारतातील सोन्याची आयात सुमारे 11.72 टक्के कमी झाली आहे. गेल्या वर्षी, भारताने पहिल्या सहामाहीत 346.38 टन सोने आयात केले होते, ते आता 308.78 टन केले आहे. दिवाळीच्या उरलेल्या दिवसांतही दागिने यासह इतर वस्तूंची विक्री वाढेल, अशी आशा देशभरातील व्यापाऱ्यांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com