Goa Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, गोव्यातील भाव जाणून घ्या

दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती स्थिर आहेत.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel Price dainik gomantak
Published on: 
Updated on: 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत घसरण होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीतील बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती स्थिर आहेत.

गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) मध्ये पेट्रोल 17 पैशांनी स्वस्त होऊन 96.59 रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल 17 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.44 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त होऊन 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 27 पैशांनी महागले असून ते 107.74 रुपये प्रतिलिटर झाले आहे. डिझेल 26 पैशांनी वाढले असून 94.51 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

Goa Petrol-Diesel Price
7th Pay Commission: मोदी सरकार उद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट, पगार थेट 27,000 रुपयांनी वाढणार!

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Taxi Fare
E20 Petrol Problems Goa
Oil tank viral video young man jumps into oil tank
US-Iran Tension
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com