Goa Petrol-Diesel Price: अर्थसंकल्पातून पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळणार? जाणून घ्या गोव्यातील ताजे भाव

देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Goa Petrol-Diesel Price 01 February 2024
Goa Petrol-Diesel Price 01 February 2024Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price 01 February 2024:  भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) (Interim Budget 2024) सादर होणार आहे. सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात दिलासा देईल, अशी आशा आहे.

मात्र, आज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. काही राज्यात दर कमी झाले आहेत तर काही ठिकाणी दरात वाढ झाली आहे. जाणून घेऊया गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलचे ताजे भाव.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.50

Panjim ₹ 97.50

South Goa ₹ 97.38

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.06

Panjim ₹ 90.06

South Goa ₹ 89.94

देशातील महानगरांबद्दल बोलायचं तर राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल (Petrol Price Today) आणि डिझेलच्या (Diesel Price Today) दरात कोणताही बदल झालेला नाही.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता ताजे इंधन दर

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com