Global Recession: वर्षाच्या अखेरीस ब्रिटनवर येणार 1990 सारखे आर्थिक संकट

ऋषी सुनक आणि लिझ ट्रसमध्ये, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनण्याची शर्यत चालू असताना युरोप सध्या कठीन परिस्थिती मधून जात आहे.
Britain
BritainDainik Gomantak
Published on
Updated on

ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि लिझ ट्रसमध्ये, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनण्याची शर्यत चालू असताना युरोप सध्या कठीन परिस्थिती मधून जात आहे. दरम्यान, बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर 0.5 टक्क्यांवरून 1.75 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे तसेच बँक ऑफ इंग्लंडच्या या निर्णयाला आर्थिक तज्ज्ञ फारसे चांगले पाऊल मानत नाही आहेत. (Global Recession A 1990-like economic crisis will hit Britain by the end of the year)

Britain
RBIने तिसऱ्यांदा केली रेपो दरात वाढ, कर्जदारांना धक्का, EMIमध्ये होणार वाढ

या संदर्भात, एका अहवालात असे म्हटले की 2022 च्या अखेरीस यूके आर्थिक मंदी मध्ये येईल, जी 2008 च्या आर्थिक संकटानंतरची सर्वात मोठी आणि 1990 च्या दशकासारखी खोल असेल असंही यावेळी सांगण्यात आले आहे. या हिवाळ्यात गॅस आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे बँक ऑफ इंग्लंडने एका इशाऱ्यामध्ये हा खुलासा केल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, बँक ऑफ इंग्लंडने 1997 पासून व्याजदरात सर्वाधिक वाढ केली आहे.

युक्रेनमधील महामारी आणि युद्धानंतर वास्तविक घरगुती उत्पन्नात घट झाल्याने अन्न, इंधन, वायू आणि इतर अनेक वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. वृत्तानुसार, गव्हर्नर अँड्र्यू बेली यांनी आर्थिक संकटासाठी "रशियन कृत्य" आणि "ऊर्जेचे झटके" यांना दोष दिला आहे. ऊर्जेच्या किमती अर्थव्यवस्थेला पाच तिमाही मंदीत ढकलतील - 2023 मध्ये प्रत्येक तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) कमी होईल आणि 2.1 टक्क्यांनी घसरेल असंही सांगण्यात आलं आहे.

Britain
RBI MPC Meeting: RBI रेपो दर वाढवण्याच्या तयारीत, EMI महाग होण्याची शक्यता

"त्यानंतरची वाढ ऐतिहासिक मानकांनुसार खूपच कमकुवत असणार आहे," बँकेने 2025 पर्यंत शून्य किंवा कमी वाढ होईल असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. अहवालानुसार, गंभीर आर्थिक परिस्थितीत, वास्तविक घरगुती उत्पन्न सलग दोन वर्षे कमी होईल तसेच 1960 च्या दशकात नोंदी सुरू झाल्यापासून हे पहिल्यांदाच घडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com