नवी दिल्ली : जागतिक आर्थिक अंदाज वर्तवणारी आणि सल्ला देणारी कंपनी ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स कंपनीने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 11.8 टक्क्यांवरून 10.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यासाठी कोविड -19 च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर पडणारा ताण, लसींच्या किंमतीवरून सुरू असलेला गोंधळ आणि कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी सरकारकडे नसलेले ठोस धोरण या गोष्टी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
RBI New Rule: आरबीआयचे बँकांसाठी नवीन नियम; जाणून घ्या
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने या कारणांना दिले महत्व
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने म्हटले होते की, येणाऱ्या काळात कडक निर्बंध, मजबूत ग्राहक आणि भारताच्या स्थानिक भागात लॉकडाउन लागू करण्याच्या निर्णयामुळे येत्या काही वर्षांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक प्रभाव कमी होईल, असेही सल्लागार संस्थेने म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य विभागावरचे वाढते ओझे लक्षात घेता, लसीची किंमत निश्चित करण्यात दिरंगाई आणि साथीचा रोग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या ठोस रणनीतीचा अभाव या सर्वांचा विचार करता 2021 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 10.2 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, असे ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने म्हटले आहे.
GDP वाढीचा अंदाज कमी करू
दुसर्या तिमाहीत तिमाही आधारावर जीडीपी वाढ होईल. जर महाराष्ट्रासारखी इतर राज्येही त्यांच्या आरोग्यसेवेवर ताण पडल्याने लॉकडाउन जाहीर करत असेल, तर आम्ही पुन्हा GDP वाढीचा अंदाज कमी करू. संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये भारताची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही कोविड-19 रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची कमतरता आहे. एवढेच नव्हे तर काही अत्यावश्यक औषधांची टंचाईदेखील जाणवत आहे, असे ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.