अदानी समूहचा झारखंडमध्ये 1600 MW वीज प्रकल्प, बांगलादेशला होणार वीजपुरवठा

दिल्लीत गौतम अदानी आणि बांगलादेश पंतप्रधान शेख हसिना यांची भेट
अदानी समूहचा झारखंडमध्ये 1600 MW वीज प्रकल्प, बांगलादेशला होणार वीजपुरवठा
Published on
Updated on

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh Prime Mininster Sheikh Hasina) सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात शेख हसीना केवळ राजकीय व्यक्तींनाच भेटत नाहीत, तर बांगलादेशातील गुंतवणुकीसाठी अनेक बड्या भारतीय उद्योगपतींनाही भेटत आहेत. अशीच एक बैठक शेख हसीना आणि भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात झाली.

बैठकीत अदानी यांनी सांगितले की झारखंडमधील गोड्डा पॉवर प्रोजेक्ट (Godda Power Project) अंतर्गत टाकण्यात येत असलेल्या ट्रान्समिशन लाइनचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. यानंतर अदानी समूहाची कंपनी 'अदानी पॉवर' (Adani Power) झारखंडमधील गोड्डा येथून बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाला (Bangladesh Power Development Board) या ट्रान्समिशन लाइनद्वारे वीजपुरवठा सुरू करेल.

अदानी समूहचा झारखंडमध्ये 1600 MW वीज प्रकल्प, बांगलादेशला होणार वीजपुरवठा
Rohit Sharma म्हणतो भारत-पाकिस्तान फायनल होणार! काय आहेत शक्यता

बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. 'बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दिल्लीत भेटणे हा सन्मान आहे. बांगलादेशसाठी त्यांची दृष्टी प्रेरणादायी आणि धाडसी आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी देशाच्या विजय दिनापर्यंत आमचा 1600 मेगावॅटचा गोड्डा पॉवर प्रकल्प आणि बांगलादेशला समर्पित ट्रान्समिशन लाइन सुरू करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.'

अदानी पॉवर (Adani Power) झारखंडमधील गोड्डा येथे असलेल्या 1600 मेगावॅटच्या थर्मल पॉवर प्लांटमधून डिसेंबरपर्यंत बांगलादेशला वीज निर्यात करण्यास सुरुवात करू शकते. बांगलादेशला समर्पित ट्रान्समिशन लाइन 16 डिसेंबर 2022 रोजी देशाच्या विजय दिनानिमित्त कार्यान्वित करण्याची योजना आहे.

अदानी समूहचा झारखंडमध्ये 1600 MW वीज प्रकल्प, बांगलादेशला होणार वीजपुरवठा
Sindhudurg: किंगकोब्राला पकडून स्वत:जवळ ठेवल्याप्रकरणी कथित सर्पमित्राला अटक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com