Gautam Adani says that  country's economy will be 15  trillion
Gautam Adani says that country's economy will be 15 trillionDainik Gomantak

"देशाची अर्थव्यस्था 15 ट्रिलियन डॉलर्स होईल माझा विश्वास"

गौतम अदानी यांनी पुढील दोन दशकांत देशाची अर्थव्यस्था ही 15 लाख कोटी इतकी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Published on

देशातील एक मोठे उद्योजक गौतम अदानी(Gautam Adani) यांनी पुढील दोन दशकांत देशाची अर्थव्यस्था (Economy) ही 15 लाख कोटी इतकी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. (GDP)

सोमवारी अदानी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) आपल्या शेअर्स धारकांना संबोधित करताना अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, येत्या चार वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान 5 ट्रिलियन डॉलर्स घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते की देश हे लक्ष्य सहजपणे साध्य करेल आणि दोन दशकांत ते त्यापेक्षा तीन पट म्हणजेच जवळपास 15 ट्रिलियन डॉलर्स इतकी होईल.

Gautam Adani says that  country's economy will be 15  trillion
मार्केट तेजीतच, सेन्सेक्सही 300 हून अधिक वाढला

गौतम अदानी यांनी विकासाच्या मार्गावर वेळोवेळी समस्या आल्या आहेत आणि पुढेही येतच राहतील असे सांगत परंतु यात शंका नाही की सर्वात मोठा मध्यम वर्ग, वाढीव कामगार वर्ग आणि ग्राहकवर्गाचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होईल पुढे ते म्हणाले की कोरोना संकटाने देश आणि जगाला मोठे धडे दिले आहेत आणि यामुळे भविष्यासात हे सगळे फायदायचेच ठरणार आहे. तसेच मागील काहीदिवसांपूर्वी काही गैरसमजांमुळे कंपनीचे छोटे आणि किरकोळ शेअर धारक त्रस्त झाले होते. असेही ते म्हणाले. परंतु कंपनी आपल्या सामर्थ्यासह अशा प्रकारच्या अडचणींवर मात करत राहील.आणि पुढे जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की वापर आणि बाजार भांडवलाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये समावेश होईल.तसेच इतिहासाने हे सिद्ध केले आहे की प्रत्येक साथीच्या संकटापासून आपण धडे घेतले आहेत आणि त्यात बऱ्याच प्रमाणात सुधारणाही केले आहेत. आणि यापुढेही असाच लढा देऊ.

आणि ही भारताची अर्थव्यवस्था नक्कीच 15 लाख कोटी पर्यंत पोहचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com