उद्योगपती गौतम अदानी देशाचे नवे 'सिमेंट किंग'

Holcim ग्रुपच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत.
Gautam Adani
Gautam Adani Dainik Gomantak
Published on
Updated on

उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे 'सिमेंट किंग' होणार आहेत. त्यांच्या अदानी समूहाने देशातील दोन मोठ्या सिमेंट कंपन्या, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स, खरेदी केल्या आहेत. अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही उतरणार आहे. (Gautam Adani becomes new cement king of India)

Gautam Adani
नवी कार घेतानाही होऊ शकते चूक, व्यवहार करताना जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

अदानी नवे सिमेंट किंग
Holcim ग्रुपच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. Holcim ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे. अदानी समूहाच्या या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे. अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत. तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 31 दशलक्ष टन आहे.

Gautam Adani
खुशखबरी: लग्नाच्या हंगामात सोने-चांदीच्या दरात घसरण

Holcim आणि त्याच्या उपकंपन्यांचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.19% आणि ACC मध्ये 54.53% हिस्सा आहे. ACC सिमेंटमधील 54.53% स्टेकपैकी, 50.05% स्टेक अंबुजा सिमेंट मार्फत विकत घेतला होता. अदानी समूहाने दोन्ही कंपन्यांमधील Holcim च्या स्टेकसाठी $10.5 बिलियन (सुमारे 81,360 कोटी रुपये) चा करार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com