Fuel Price: तुम्हाला माहितीये का भारतात इंधनाच्या किमती कशा ठरवल्या जातात?

Fuel Price Determination: भारतात दररोज सकाळी 6:00 वाजता सुधारित इंधन दर घोषित केले जातात, याला डायनॅमिक इंधन किंमत पद्धत म्हणतात.
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Fuel Price Determination: भारतात दररोज सकाळी 6:00 वाजता सुधारित इंधन दर घोषित केले जातात, याला डायनॅमिक इंधन किंमत पद्धत म्हणतात.

ऑइल रिफायनरीज: या रिफायनरीज डब्ल्यूटीआय (West Texas Intermediate) क्रूड, ब्रेंट क्रूड, ओपेक बास्केट क्रूड इत्यादी क्रूड खरेदी करतात. त्यानंतर या क्रूड्सचे रुपांतर पेट्रोल, डिझेल (Diesel), एव्हिएशन टर्बाइन इंधन, जैवइंधन इ केले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), नायरा एनर्जी, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, शेल, ओएनजीसी, सौदी आरामको, इत्यादी रिफायनरीजची उदाहरणे आहेत.

Petrol-Diesel Price
Fuel Price: मोठी खूशखबर, तेलाच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या नव्या किमती

OMC (Oil Marketing Companies): या अशा कंपन्या आहेत, ज्या रुपांतरित क्रूड (Petrol, Diesel etc.) डीलर्संना आणि शेवटी वापरकर्त्यांना विकतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, शेल, एस्सार इ. अशा रिफायनरीजची उदाहरणे आहेत.

डीलर्स: डीलर्स हे असे लोक आहेत, जे OMCs कडून इंधन विकत घेण्याच्या आणि वापरकर्त्यांना वितरित करण्याच्या व्यवसायात गुंतलेले असतात. ते इंधनाचे वितरक आहेत. उदाहरण: अरविंद पटेल आणि प्रवीण पटेल हे मारुती सुझुकी कंपनीच्या कारचे वितरक आहेत, त्यांना कंपनीचे डीलर म्हटले जाते आणि ते ‘पटेल मोटर्स’ म्हणून ओळखला जाणारा व्यवसाय चालवतात.

Petrol-Diesel Price
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार बंपर वाढ, सरकारकडून कन्फर्म !

भारतातील इंधनाच्या किमतींचे अधिकृत नियामक कोण आहे?

करांव्यतिरिक्त, केंद्र सरकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत PPAC (Petroleum Planning and Analysis Cell) द्वारे ठरविलेल्या आधारभूत किमती आणि कॅप किमतींद्वारे इंधनाच्या किमती नियंत्रित करते, ज्यावर डीलर आणि OMC एकमेकांशी व्यवहार करतात. भारतीय बास्केटच्या सध्याच्या इंधनाच्या किमतींबद्दल त्याच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.ppac.gov.in/) माहिती मिळू शकते.

Petrol-Diesel Price
Fuel Tax Update: पेट्रोल अन् डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

याशिवाय, अनेक परवाने, नियम, रिफायनरीज, ओएमसी, डीलर्स इत्यादींना लागू होणारे कायदे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com