Defence Sector Stocks: डिफेन्स स्टॉक्सचा धुमाकूळ; HAL सह 4 शेअर्सनी गाठला Lifetime High

Defence Stocks : संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये बाजारात नेत्रदीपक तेजी पाहायला मिळत असून चार कंपन्यांचे शेअर्स सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत आहेत.
Four Defence stocks at lifetime higj
Four Defence stocks at lifetime higjDainik Gomantak
Published on
Updated on

Defence Stocks Focus : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. संरक्षण क्षेत्रातील दिग्गज मल्टीबॅगर कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा स्टॉक वाढतच चालला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअरने (Lifetime High) नवीन उच्चांक गाठला आहे. याशिवाय भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि माझगाव डॉक या कंपन्यांच्या शेअर्समध्येही खरेदी दिसून आली आणि या कंपन्यांचे शेअर्सही नव्या उच्चांकावर व्यवहार करत आहेत.

संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) चा शेअर सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात 3326 रुपयांवर पोहोचला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.

गेल्या एका महिन्यात एचएएलच्या स्टॉकमध्ये 11.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअरने 3 महिन्यांत 22 टक्के, 6 महिन्यांत 18 टक्के आणि एका वर्षात 73 टक्के परतावा दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत या शेअरने ३ वर्षांत ४२० टक्के परतावा दिला आहे.

भारत डायनॅमिक्सच्या शेअरमध्येही मोठी तेजी आहे. सोमवारच्या सत्रात शेअरने 1164.50 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला.

BDL ने आपल्या भागधारकांना एका महिन्यात 14%, 3 महिन्यांत 22%, एका वर्षात 45.53% आणि दोन वर्षात 217% उत्कृष्ट परतावा दिला आहे. भारत डायनॅमिक्सने 3 वर्षात 377% चा उत्कृष्ट मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

Four Defence stocks at lifetime higj
Lloyd Austin in India: भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार; नाटोबाबत लॉयड ऑस्टिन यांचे चीनला उत्तर

भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टॉकनेही 118.65 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. BEL ने एका महिन्यात 10%, 3 महिन्यात 21%, एका वर्षात 44% आणि 3 वर्षात 372% परतावा दिला आहे.

सोमवारच्या सत्रात माझगाव डॉक शेअरचा समभागही ऐतिहासिक उच्चांकावर व्यवहार करत होता. माझगाव डॉकने रु.1006 चा उच्चांक गाठला. दुसरीकडे, स्टॉकने एका महिन्यात 27%, 3 महिन्यांत 36%, 1 वर्षात 247% आणि 2 वर्षात 334% परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

Four Defence stocks at lifetime higj
Mukhtar Ansari: …म्हणून 32 वर्षे जुन्या खटल्यात मुख्तार अन्सारीला जन्मठेप; 10 मुद्यांमध्ये समजून घ्या संपूर्ण प्रकरण

संरक्षण क्षेत्रात तेजी  

खरे तर भारत सरकारला संरक्षण क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व संपवायचे आहे. सरकारने अनेक संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी घातली असून देशातच उत्पादनासाठी नियम केला आहे.

अशा परिस्थितीत सरकारपासून खासगी संरक्षण कंपन्यांना सरकारकडून सातत्याने नवनवीन आदेश येत आहेत. त्यामुळे या कंपन्या देशासाठी केवळ उत्पादनच करत नाहीत तर निर्यातीवरही भर देत आहेत. देशांतर्गत संरक्षण कंपन्यांना उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com