CBI ची मोठी कारवाई, ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक यांना अटक

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे.
Chanda Kochhar
Chanda KochharDainik Gomantak
Published on
Updated on

Chanda Kochhar: ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. लोन फसवणूक प्रकरणी सीबीआयने ही अटक केली आहे. चंदा कोचर सीईओ असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात अनियमितता दाखवल्याचा आरोप केला होता. ईडीने फेब्रुवारी 2019 मध्ये या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. याअंतर्गतच कारवाई करण्यात आली. चंदा कोचर यांच्यावर भेदभाव आणि व्हिडिओकॉन समूहाची बाजू घेतल्याचा आरोप आहे.

काय प्रकरण आहे?

चंदा कोचर यांच्यावर 2009 ते 2011 दरम्यान व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना कर्ज देण्याबाबत ICICI बँकेतील (ICICI Bank) त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. चंदा कोचर, त्यांचे पती आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयने गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी न्यूपॉवर रिन्युएबल्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक (Investment) केल्याचा आरोप होता.

अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाने चंदा कोचर यांची सीईओ पदावरुन बडतर्फीची कारवाई वैध ठरवली आहे. यासोबतच निवृत्तीनंतरच्या लाभासाठीचा त्यांचा अंतरिम अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com