Forex Reserves: देशाच्या परकीय गंगाजळीत 3.66 अब्ज डॉलरची वाढ, सोन्याच्या साठ्यातील घटीने वाढवली चिंता; जाणून घ्या

Forex Reserves: गेल्या काही आठवड्यांपासून भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने होत असलेली घसरण थांबली आहे.
Forex Reserves
Forex ReservesDainik Gomantak
Published on
Updated on

Forex Reserves: गेल्या काही आठवड्यांपासून भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने होत असलेली घसरण थांबली आहे. शुक्रवारी, 10 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 3 मे 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $3.66 अब्जांनी वाढून $641.59 अब्ज झाला आहे. 26 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 637.92 अब्ज डॉलर होता.

सोन्याच्या साठ्यात घट

RBI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 3 मे 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन संपत्तीत वाढ झाली आहे. 4.45 अब्ज डॉलरच्या वाढीसह तो आता 564.16 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. याशिवाय, रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यात घट झाली असून ती 653 दशलक्ष डॉलर्सनी घसरुन 54.88 अब्ज डॉलरवर आली आहे. त्याचवेळी, SDR $2 दशलक्षच्या वाढीसह $18.05 बिलियनवर पोहोचला आहे.

Forex Reserves
Indian Economy: भारत लवकरच बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार; अर्थ मंत्रालयाचा अंदाज

परकीय चलन साठ्यावर काय परिणाम होतो?

यासह, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ठेवलेला साठा 140 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 4.49 अब्ज डॉलरवर आला आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार गेल्या काही आठवड्यांपासून बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत, ज्यामुळे परकीय चलन साठ्यावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील, ज्याचा थेट परिणाम परकीय चलनाच्या गंगाजळीवर होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com