Manufacturing Defect: ग्राहक हक्काचा विजय! फोर्डला कोर्टाचा दणका; कारमधील डिफॉल्टसाठी ग्राहकाला 42 लांखांची भरपाई देण्याचे आदेश

Ford India: भरपाई रक्कम मिळाल्यावर ग्राहकाने कार कंपनीकडे परत द्यावी असेही आदेशात म्हटले आहे.
Manufacturing Defect: ग्राहक हक्काचा विजय! फोर्डला कोर्टाचा दणका; कारमधील डिफॉल्टसाठी ग्राहकाला 42 लांखांची भरपाई देण्याचे आदेश
Dainik Gomantak
Published on
Updated on

Manufacturing Defect in Ford Titanium Endeavour: सुप्रीम कोर्टाने नुकतेच फोर्ड इंडिया लिमिटेडला एका ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून 42 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. ज्याला फोर्ड इंडियाने उत्पादनात दोष असलेली कार विक्री केली होती.

हे प्रकरण एका ग्राहकाच्या मालकीच्या Ford Titanium Endeavour 3.4L शी संबंधित आहे.

कार खरेदी केल्यापासूनच तेल गळतीसह विविध दोष निदर्शनास आणून देत मालकाने राज्य ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

राज्य आयोगाने कंपनीला इंजिन मोफत बदलून प्रतिदिन दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय आयोगानेही हा आदेश कायम ठेवला, त्यानंतर फोर्ड इंडियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अपील केले होते.

Manufacturing Defect: ग्राहक हक्काचा विजय! फोर्डला कोर्टाचा दणका; कारमधील डिफॉल्टसाठी ग्राहकाला 42 लांखांची भरपाई देण्याचे आदेश
Madras High Court: पत्नीच्या त्यागाची काही किंमत आहे की नाही? कायद्यात तरतूद नसलेल्या 'त्या' गोष्टीची नायमूर्तींनी घेतली दखल

सर्वोच्च न्यायालयात अपील प्रलंबित असताना फोर्डने कारचे इंजिन बदलले. मात्र, इंजिन बदलूनही गाडी रस्त्यावर धावण्याच्या लायकीची नव्हती, असे ग्राहकाने सांगितले.

ग्राहकाने पुढे सांगितले की कारमध्ये अनेक उत्पादन दोष आहेत, ज्यामुळे ही कार चालवणे कठीण आहे.

Manufacturing Defect: ग्राहक हक्काचा विजय! फोर्डला कोर्टाचा दणका; कारमधील डिफॉल्टसाठी ग्राहकाला 42 लांखांची भरपाई देण्याचे आदेश
Karnataka High Court: पंतप्रधानांवरील टीका देशद्रोह नाही; कर्नाटक हायकोर्टाची टिप्पणी

या बाबी विचारात घेऊन न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ग्राहकाला ४२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश फोर्ड इंडियाला दिले.

राज्य आयोगाच्या आदेशानंतर कंपनीने ६ लाख रुपये आधीच दिले असल्याने उर्वरित ३६ लाख रुपये ग्राहकाला द्यावे लागतील.

याशिवाय, ग्राहकाला कारच्या विम्यासाठी 87,000 रुपये देण्याचेही निर्देश दिले होते. 36,87,000 रुपये मिळाल्यावर ग्राहकाने कार कंपनीकडे परत द्यावी असेही आदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com