Flipkart मधील 'बन्सल युग' संपले; बिन्नी बन्सल यांनी संचालक पदाचा दिला राजीनामा

Binny Bansal Flipkart Resigned As Director: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.
Flipkart's
Flipkart's Dainik Gomantak
Published on
Updated on

Binny Bansal Flipkart Resigned As Director: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच फ्लिपकार्टमधील 16 वर्षांपासून सुरु असलेले 'बन्सल युग' संपले. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी 2007 मध्ये फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती. सचिन बन्सल यांनी आपला संपूर्ण स्टेक वॉलमार्टला आधीच विकला होता. आता बिन्नी बन्सल यांनीही वॉलमार्टच्या मालकीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देऊन कंपनी सोडली आहे. बिन्नी यांनी कंपनीतील उर्वरित स्टेक विकल्यानंतर काही महिन्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आता बिन्नी बन्सल यांनीही वॉलमार्टच्या मालकीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देऊन कंपनी सोडली आहे. बिन्नी यांनी कंपनीतील उर्वरित स्टेक विकल्यानंतर काही महिन्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

Flipkart's
Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांचा भारतीय ग्राहकांवर डोळा, ई-रिटेल मार्केट 2028 पर्यंत ओलांडणार 13 लाख कोटींचा टप्पा

राजीनाम्यावर काय म्हणाले बिन्नी बन्सल?

मनीकंट्रोलवर प्रसिद्ध झालेल्या अहवालात बिन्नी बन्सल आणि फ्लिपकार्टने याला दुजोरा दिला आहे. बिन्नी बन्सल म्हणाले की, “फ्लिपकार्ट समूहाच्या गेल्या 16 वर्षांतील कामगिरीचा मला अभिमान आहे. कंपनी मजबूत स्थितीत आहे. हे जाणून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे.''

Flipkart's
Flipkart च्या गटांगळ्या! गेल्या आर्थिक वर्षातील तोटा 5 हजार कोटींनी वाढला

दुसरीकडे, वॉलमार्टने 2018 मध्ये फ्लिपकार्टमधील कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला होता. Flipkart सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी आधीच 2018 मध्ये वॉलमार्टला त्यांचे संपूर्ण स्टेक विकले होते, तर त्यांचे पार्टनर आणि इतर सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी संपादनानंतरही फ्लिपकार्टमधील एक छोटासा हिस्सा राखून ठेवला होता. फ्लिपकार्टची सुरुवात 2007 मध्ये बंगळुरुमधील एका छोट्या 2BHK फ्लॅटमधून झाली होती. त्यावेळी, सचिन बन्सल फ्लिपकार्टचे सीईओ बनले तर बिन्नी यांनी सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. कंपनीने 5 वर्षांच्या अवधीतच प्रचंड यश मिळवले. 2012 मध्ये $150 दशलक्ष उभारल्यानंतर, Flipkart भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com