Union Budget 2025: इतिहास घडणार! सलग आठव्यांदा 'बजेट' मांडणाऱ्या निर्मला सीतारमण ठरणार पहिल्या अर्थमंत्री

Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून ज्याची करदाते आणि सामान्य लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
Union Budget 2025: इतिहास घडणार! सलग आठव्यांदा 'बजेट' मांडणाऱ्या निर्मला सीतारमण ठरणार पहिल्या अर्थमंत्री
Finance Minister Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करणार असून ज्याची करदाते आणि सामान्य लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. सलग आठव्यांदा सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, सलग आठ केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.

याआधीचा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर होता, ज्यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते. तथापि, देसाई यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले होते, त्यापैकी आठ वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प होते. यामुळे आतापर्यंत सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड देसाई यांच्यावर नावावर आहे. पारंपारिकरित्या अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात, परंतु भारतीय इतिहासात अशा काही परिस्थिती निर्माण झाल्या होत्या, जिथे पंतप्रधानांना तो सादर करावा लागला होता.

Union Budget 2025: इतिहास घडणार! सलग आठव्यांदा 'बजेट' मांडणाऱ्या निर्मला सीतारमण ठरणार पहिल्या अर्थमंत्री
Nirmala Sitharaman: ‘’एकाही बड्या उद्यागपतीचं कर्ज माफ झालं नाही’’; अर्थमंत्र्यांनी मांडला मोदी सरकारच्या 10 वर्षाचा लेखाजोखा

दरम्यान, पहिले आणि सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे जवाहरलाल नेहरु, ज्यांनी 1958 मध्ये पंतप्रधान असताना अर्थसंकल्प मांडला होता. मुंध्रा घोटाळ्याची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर त्याचवर्षी 12 फेब्रुवारी रोजी तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांनी राजीनामा दिला होता, ज्यामुळे नेहरुंना अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारावी लागली होता. तर इंदिरा गांधींनी 1970 मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता, जेव्हा मोरारजी देसाई यांनी 1969 मध्ये राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे, राजीव गांधी यांनाही जानेवारी ते जुलै 1987 दरम्यान अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती, कारण व्ही.पी. सिंग यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Union Budget 2025: इतिहास घडणार! सलग आठव्यांदा 'बजेट' मांडणाऱ्या निर्मला सीतारमण ठरणार पहिल्या अर्थमंत्री
Finance Minister Nirmala Sitharaman: लोकसभेत श्वेतपत्रिका सादर, मोदी सरकार UPA च्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर करणार चर्चा

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 तारीख आणि वेळ

निर्मला सीतारामन या शनिवार (1 फेब्रुवारी 2025 रोजी) सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करतील. मात्र, केंद्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृतरित्या पुष्टी केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com