ED On Xiaomi: मोठी बातमी! चीनी कंपनी शाओमीचा 5,5571 कोटी रुपयांचा निधी ED गोठवणार

मुळ चीनी कंपनी असणाऱ्या शाओमी कंपनीने दोन अमेरिकी कंपन्यांनाही रॉयल्टी पाठवली जात होती.
ED On Xiaomi
ED On XiaomiDainik Goamantak
Published on
Updated on

चीनी मोबाईल उत्पादन कंपनी शाओमीचा (Xiaomi) 5 हजार 551 कोटींचा निधी ईडीकडून गोठवण्यात येणार आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे (Foreign Exchange Management Act) उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं कंपनीविरुद्ध तपास केला होता. त्यानंतर कंपनीचा 5 हजार 551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश फेमा (FEMA) कडून देण्यात आले आहेत. ईडीची (Enforcement Directorate) देशातील आजवरची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे.

ED On Xiaomi
5G Launching: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशात 5G सेवा लॉन्च; जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

शाओमी कंपनीने 2014 मध्ये भारतीय मोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केला. कंपनीने दुसऱ्याच वर्षापासून रॉयल्टीच्या नावाखाली कोट्यवधी रूपये परदेशात पाठवण्यास सुरुवात केली. मुळ चीनी कंपनी असणाऱ्या शाओमी कंपनीने दोन अमेरिकी कंपन्यांनाही रॉयल्टी पाठवली जात होती. या अमेरिकेतील कंपन्यांचा शाओमीच्या भारतातील कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. हजारो कोटी रुपये परदेशात पाठवणं हे फेमाचे उल्लंघन असल्याचं ईडीने म्हटले आहे.

ED On Xiaomi
5G: ‘गरीब डाटा खायेगा या आटा’, 6 वर्षांपूर्वी केलेल्या लालू यादवांच्या टीकेला PM मोदींचे उत्तर

कंपनीवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास, FEMA उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला तीनपटींहून अधिक रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे. ईडीनं केलेली भारतातील आतापर्यंतच्या जप्तीच्या कारवाईंपैकी ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे. शाओमी कंपनीचे 5,551 कोटी रुपये जप्त करण्याच्या ईडीच्या निर्णयाला फेमाने मान्यता दिली आहे. यापूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयानं ED च्या कारवाईविरुद्ध शाओमीचे अपील फेटाळले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com