
Fake Challan Scam: अलिकडील काळात भारतातील सायबर घोटाळ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहेत. ऑनलाइन स्कॅमर लोकांचे पैसे चोरण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत.
आता यामध्ये आणखी एक नवीन पद्धत समोर आली आहे ज्याद्वारे लोकांच्या पैशांची चोरी केली जात आहे. ही नवी पद्धत म्हणजेच बनावट ई-चलन घोटाळा.
सायबर तंत्रज्ञ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आता ई-चलन पेमेंट घोटाळे वाढू लागले आहेत.
यासाठी हॅकर्स फेक मेसेज पाठवून लोकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. हे चलान वैध पावत्यांसारखेच असतात. यामध्ये मेलिशियस लिंक्सचा समावेश असतो. ज्यातून हॅकर यूजर्सच्या बॅंक अकाउंटवर नियंत्रण मिळवता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर लोकांना अस्सल वाटणारे गाडीच्या दंडाच्या पावतीचे मेसेज पाठवत आहेत. यातील पावती वाहतूक पोलिसांकडून जारी केलेल्या पावतीसारखीच दिसते.
"तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असून, तुम्हाला दंड भरावा लागेल," असे मेसेजमध्ये लिहलेले असते. मेसेजमध्ये एक पेमेंट लिंकही दिलेली असते. त्यावर क्लिक केल्यास व्यक्तीचे बॅंक अकाउंट हॅकर क्षणात मोकळे करू शकतात.
वाहतूक दंडाच्या फेक मेसेजमधील लिंकवर एखाद्याने क्लिक केले तर त्याला बनावट वेबसाइटवर नेले जाते. ही वेबसाइट अगदी वाहतूक पोलिसांच्या वेबसाइटसारखीच दिसते.
वेबसाइटवर त्यांना त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती विचारली जाते. तसेच दंड भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर पेमेंट लिंकवर क्लिक केल्यास, सायबर गुन्हेगार पीडिताच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवतात. आणि पैशांवर डल्ला मारतात.
केंद्र सरकारची अधिकृत साइट: https://echallan.parivahan.gov.in/
गोवा सरकारची अधिकृत साइट: https://echallanpg.goa.gov.in/
महाराष्ट्र सरकारची अधिकृत साइट: https://mahatrafficechallan.gov.in/
सायबर चोरट्यांच्या बनावट वेबसाइट्समध्ये शवेटी .gov नसते. त्यामुळे ज्या वेबसाइटच्या शेवटी .gov असते तीच सरकारची अधिकृत वेबसाइट असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.