Education Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण व्यवस्था कोलमडून गेली आहे. देशातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांनी 100 चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे शिक्षणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.
यातील ठळक मुद्दे:
कौशल्य विकास आणि स्टार्टअपला प्राधान्य
सरकारी शाळेतील 'वन क्लास-वन टीव्ही चॅनेल' - पीएम ई विद्या वाढवणार
स्थानिक भाषेत 12 ते 100 टीव्ही चॅनेल मार्फत शिक्षणाला प्राधान्य
ई-काँटेट वर भर देऊन मुलांचं शिक्षण गतीशील करणार
ही चॅनेल्स प्रादेशिक भाषांमध्ये असणार
रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध होणार
त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करता येणार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.