आधार कार्ड चोरीला गेले तरी राहणार सेफ; कसे ते बघा

जर एखाद्याचे आधार कार्ड चोरीला गेले आणि चुकीच्या हातात गेले तर त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो.
Aadhar Card
Aadhar CardDainik Gomantak
Published on
Updated on

आधार कार्ड (Adhar Card) हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे असं म्हणायला हरकत नाही. आधार कार्ड हे कोणत्याही व्यक्तीची अधिकृत ओळख म्हणून कामी येते. सध्या हे इतके महत्त्वाचे दस्तऐवज आहे की, जर एखाद्याचे आधार कार्ड चोरीला गेले आणि चुकीच्या हातात गेले तर त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात आधार कार्डचा गैरवापर होऊन गुन्हे देखील घडले आहेत. आधार कार्डचा गैरवापर करून कर्ज घेतल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. (Even if Aadhar card is stolen it will be safe See how)

Aadhar Card
सोने झाले स्वस्त, चांदीची चमक वाढली, आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती

आधार कार्ड सुरक्षित ठेवा

ही सर्व परिस्थिती पाहता, प्रत्येक व्यक्तीने आपले आधार कार्ड सुरक्षित राहावे आणि चुकीच्या हातापर्यंत पोहोचल्यानंतरही आधार कार्डचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, आधार कार्डधारकांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की ते आवश्यक असल्यास त्यांचे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक देखील करता येणार आहे. जर तुमचे आधार कार्ड वापरात नसेल तर तुम्ही ते लॉक करून सुरक्षीत ठेवू शकता आणि जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कुठेतरी वापरायचे असेल तर तुम्ही ते अनलॉक करू शकता.

आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याचे फायदे

याचा सर्वात मोठा फायदा असा की आधार कार्ड लॉकिंग झाल्यास, तुमचे आधार कार्ड चोरीला गेले किंवा हरवले आणि ते अशा व्यक्तीच्या हातात पडले ज्याच्याकडे आधार कार्ड नसावे, तरीही तुमचे आधार कार्ड सुरक्षित आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे लॉक आणि अनलॉक करू शकता ते पहा.

Aadhar Card
आज इंधनाच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर

आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याची कृती

https://uidai.gov.in वेबसाईटवर जा.

आधार सेवांमध्ये लॉक-अनलॉक बायोमेट्रिक्स असा पर्याय निवडा.

पुढे चेक बॉक्सची पुष्टी करा.

लॉक-अनलॉक बायोमेट्रिक्स वरती क्लिक करा.

आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि ओटीपी पाठवा आल्यानंतर त्यावर क्लिक करा.

OTP भरा आणि सबमिट वरती क्लिक करा.

लॉकिंग वैशिष्ट्य सक्षम करा आणि त्या वर क्लिक करा.

आता तुमचा आधार लॉक होईल, तसेच या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही ते अनलॉक देखील करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com