eShram Portal: मोदी सरकारची मोठी घोषणा, करोडो मजूरांना मिळणार आता 'ही' सुविधा!

eShram Card Download: मोदी सरकार गरिबांच्या हितासाठी अनेक गोष्टी करत आहे. त्याचबरोबर शासनाकडून मजूरांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

eShram Card Download: मोदी सरकार गरिबांच्या हितासाठी अनेक गोष्टी करत आहे. त्याचबरोबर शासनाकडून मजूरांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत.

दरम्यान, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-लेबर पोर्टलसाठी नवीन सुविधा सुरु केल्या आहेत.

या अतिरिक्त वैशिष्ट्यांमुळे पोर्टलची उपयुक्तता वाढेल आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुलभ नोंदणीला प्रोत्साहन मिळेल.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ई-श्रमवर नोंदणी केलेले कामगार आता पोर्टलद्वारे रोजगार, कौशल्य, पेन्शन (Pension) योजना आणि राज्यांच्या योजनांशी कनेक्ट होऊ शकतात.

स्थलांतरित कामगारांना लाभ

ई-श्रम वर जोडलेल्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबाचे डिटेल्स कॅप्चर करण्यास अनुमती देते. आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झालेल्या कामगारांना बालशिक्षण आणि महिला-केंद्रित योजना प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Prime Minister Narendra Modi
Old Pension बाबत सरकार घेणार मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांचे बदलणार नशीब!

डेटा शेअरिंगला प्राधान्य

आणखी एका नवीन वैशिष्ट्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा डेटा संबंधित BOCW कल्याण मंडळाशी शेअर करणे शक्य झाले आहे. "संबंधित BOCW बोर्डाकडे ई-कामगार बांधकाम कामगारांची नोंदणी आणि त्यांच्यासाठीच्या योजनांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी हे केले गेले आहे," असे मंत्रालयाने म्हटले आहे.

डेटा शेअरिंग पोर्टल

यादव यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांशी सुरक्षित पद्धतीने ई-लेबर डेटा सामायिक करण्यासाठी डेटा शेअरिंग पोर्टल (DSP) औपचारिकपणे सुरु केले. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची लक्ष्यित अंमलबजावणी करणे हा त्याचा उद्देश आहे.

Prime Minister Narendra Modi
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांसाठी सरकारने...

कल्याणकारी योजनांची उत्तम अंमलबजावणी

अलीकडेच, मंत्रालयाने विविध योजनांचा डेटा ई-श्रम डेटासह मॅपिंग करण्यास सुरुवात केली आहे, ज्यांना या योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाही अशा नोंदणीकर्त्यांना ओळखण्यासाठी. ही माहिती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही दिली जात आहे.

माहितीच्या आधारे ते असंघटित कामगारांना ओळखू शकतात जे अजूनही कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यांना प्राधान्याने मदत करु शकतात.

डेटाबेस

असंघटित क्षेत्रातील कामगारांचा सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयामार्फत 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल सुरु करण्यात आले. ही माहिती आधार कार्डशी (Aadhar Card) जोडलेली आहे. 21 एप्रिल 2023 पर्यंत, ई-श्रम पोर्टलवर 28.87 कोटीहून अधिक असंघटित कामगार नोंदणीकृत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com