EPF Withdrawal TDS Rules: पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांत फेरबदल, टीडीएस कपातीपासून असा मिळवा दिलासा; जाणून घ्या आयकर नियमांचे गणित

EPFO New Form 121 PF Withdrawal: करदात्यांसाठी आणि भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली.
EPF Withdrawal TDS Rules
EPF Withdrawal TDS RulesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

EPFO New Form 121 PF Withdrawal: करदात्यांसाठी आणि भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने पीएफ खात्यातून पैसे काढताना कापल्या जाणाऱ्या टीडीएस संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल केला. आगामी कर वर्ष 2026-27 पासून (म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन आयकर अधिनियम, 2025 च्या कलम 393(6) अंतर्गत) जर तुम्हाला पीएफ काढताना टीडीएस कट होऊ द्यायचा नसेल, तर यापुढे जुने फॉर्म 15जी आणि 15एच चालणार नाहीत. त्याऐवजी तुम्हाला नवीन ‘फॉर्म 121’ भरावा लागणार आहे.

आतापर्यंत काय नियम होता, तर 5 वर्षांच्या आत पीएफचे पैसे काढताना टीडीएस वाचवण्यासाठी वयानुसार फॉर्म भरले जात होते. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी ‘फॉर्म 15जी’ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘फॉर्म 15एच’ चालत असे. याद्वारे वार्षिक उत्पन्न करमर्यादेत नसल्याचे जाहीर केले जात होते. परंतु, नवीन नियमांनुसार कर वर्ष 2026-27 पासून हे दोन्ही फॉर्म पूर्णपणे रद्द झाले आहेत. जर कोणी जुना फॉर्म भरला, तर तो रिजेक्ट होईल आणि टीडीएस कापला जाईल.

EPF Withdrawal TDS Rules
EPFO Pension Rule: पगारातून PF कापला जातोय? रिटायरमेंटनंतर किती पेन्शन मिळेल? 'या' सोप्या फॉर्म्युल्याने करा अचूक कॅल्क्युलेशन

पात्र पीएफ सदस्य आयकर कायदा, 2025 अंतर्गत फॉर्म 121चा वापर करुन टीडीएस सवलतीचा दावा करु शकतात. यामुळे ईपीएफओला विनंती करता येते की, तुमच्या अंदाजे वार्षिक उत्पन्नावर कर दायित्व बनत नाही, त्यामुळे टीडीएस कापू नये. ईपीएफओने प्रादेशिक कार्यालयांना या फॉर्मसाठी युनिक आयडेंटिफायन नंबर जारी करण्याचे निर्देश दिले. सदस्य हा फॉर्म ऑनलाइन भरु शकतील आणि ई-साइनद्वारे त्वरित सबमिट करु शकतील.

EPF Withdrawal TDS Rules
EPFO Cyber Fraud: EPFOच्या नावानं लिंक आली तर थांबा! PF खात्यातील पैशांवर सायबर गुन्हेगारांची नजर; एका चुकीमुळे खात्यातील पैसे होतील गायब

हा फॉर्म भरताच पीएफचे पैसे पूर्णपणे टीडीएस-फ्री होतील का? तर अजिबात नाही, हा गैरसमज आहे. फॉर्म 121 हा केवळ टीडीएस रोखण्याचा एक मार्ग आहे. जर तुमची एकूण वार्षिक उत्पन्न कर मर्यादेत येत असेल, तर टीडीएस जरी कापला गेला नाही, तरी आयटीआर (ITR) फाइल करताना त्या उत्पन्नावर कर भरावाच लागेल. तसेच, एनआरआय (NRI) आणि ज्यांची एकूण अंदाजे उत्पन्नावर कर आकारणी होते, ते या फॉर्मचा फायदा घेऊ शकत नाहीत.

EPF Withdrawal TDS Rules
PF Claim New Rules: PF खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! प्रोफाइल फोटो अपडेट नसेल तर क्लेम होणार 'रिजेक्ट'; येथे पाहा संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

या प्रक्रियेसाठी पीएफ खात्याशी वैध पॅन कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे, अन्यथा फॉर्म 121 मान्य होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन क्लेम करताना जुने फॉर्म वापरण्याची चूक करु नका आणि टीडीएसच्या अतिरिक्त कपातीपासून वाचण्यासाठी नवीन फॉर्म 121 चाच वापर करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com