Auto Claim Settlement Facility: 6 कोटींहून अधिक पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सुविधेअंतर्गत मिळणार आता एवढे लाख

Auto Claim Settlement Facility: तुम्हीही पगारदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता EPFO ​​ने नोकरदारांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे.
EPFO
EPFO Dainik Gomantak

Auto Claim Settlement Facility: तुम्हीही पगारदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता EPFO ​​ने नोकरदारांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत, जर तुम्हाला शिक्षण, लग्न आणि घरासाठी पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही फास्‍ट अप्रूवलची सुविधा घेऊ शकता. या सुविधेत, कम्प्युटरद्वारे तुमचा क्लेम तपासला जातो आणि तो त्वरीत मंजूरही केला जातो. आतापर्यंत ही सुविधा खातेदारांना आजाराशी संबंधित प्रकरणांमध्ये दिली जात होती. पण आता 6 कोटींहून अधिक EPFO ​​मेंबर शिक्षण, लग्न आणि घरासाठी पैशांची गरज असताना त्याचा लाभ घेऊ शकतात.

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेची लिमीट 50,000 रुपयांवरुन 1 लाख रुपये करण्यात आली आहे. एका निवेदनानुसार, EPFO ​​ने 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 4.45 कोटी क्लेम निकाली काढले आहेत. यापैकी 60 टक्क्यांहून अधिक (2.84 कोटी) क्लेम अ‍ॅडव्हान्स (आजारपण, लग्न, शिक्षणाच्या आधारे पैसे काढणे) होते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुम्ही शिक्षण, लग्न किंवा घराच्या गरजांसाठी 1 लाख रुपये काढू शकता.

3-4 दिवसांत मंजुरी मिळते

मागील वर्षी मंजूर झालेल्या सर्व अ‍ॅडव्हान्स क्लेमपैकी सुमारे 90 लाख क्लेम ऑटो सेटल केले आहेत. नवीन सिस्टिममध्ये सर्व कामे कम्प्युटरद्वारे होत असल्याने कोणत्याही कामासाठी मनुष्यबळाची गरज भासणार नाही. यामुळेच अ‍ॅडव्हान्स क्लेमच्या मंजुरीसाठी लागणारा वेळही कमी झाला आहे. पूर्वी 10 दिवस लागायचे. मात्र आता हे काम अवघ्या 3-4 दिवसांत होते.

6 मे पासून सुविधा सुरु झाली

जर कम्प्युटर सिस्टिमने क्लेम मंजूर केला नाही, तर तो परत केला जात नाही किंवा रद्द केला जात नाही, उलट अशा प्रकरणांची पुन्हा तपासणी केली जाते आणि नंतर मंजूर केले जाते. EPFO ने 6 मे 2024 पासून ऑटोमेटिक मोडमध्ये क्लेम पास करण्याची सुविधा लागू केली आहे. आतापर्यंत 13,011 लोकांना याचा लाभ मिळाला आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आतापर्यंत 45.95 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com