मार्केटमध्ये येणार रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाइक, वैशिष्ट्ये घ्या जाणून

ही बाईक कधी होणार लॉन्च घ्या जाणून
electric bike coming with royal enfield features and design can be similar like bullet, Royal Enfield electric bike news
electric bike coming with royal enfield features and design can be similar like bullet, Royal Enfield electric bike newsDainik Gomantak

टीव्हीएस, हिरो मोटोकॉर्प, अथर आणि BMW सारख्या दुचाकी उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांच्या EV लाँच करणार आहेत. दरम्यान, बुलेट निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची घोषणा केली आहे. रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले की, भारतीय बाजारपेठ, उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक (Electric) बाइक्सची श्रेणी आणि वैशिष्ट्ये यावर चर्चा केली जात आहे. (Royal Enfield electric bike news)

ऑगस्ट 2020 मध्ये, रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दासारी यांनी माहिती दिली होती की आयशरच्या मालकीची कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल विभागात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. त्यानंतरच कंपनीने वार्षिक अहवाल 2020-2021 मध्ये इलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा उल्लेख केला होता.

electric bike coming with royal enfield features and design can be similar like bullet, Royal Enfield electric bike news
इंदिरा गांधींच्या 73 किलो चांदीचा वारस कोण?

नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज

विनोद यांनी केलेल्या घोषणेनुसार, कंपनीने रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप आधीच तयार केला आहे आणि लवकरच ईव्हीचे उत्पादन सुरू करणार आहेत. रॉयल एनफिल्डने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक बाइक नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची माहिती आहे आणि ती अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.

ही बाईक पुढच्या वर्षी येऊ शकते

रॉयल एनफिल्ड ही बाईक 2023 मध्ये कधीही लॉन्च करू शकते. यासाठी कंपनीच्या यूकेमध्ये संशोधन सुरू आहे. या बाईकची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची चिन्ह असून ती पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते.

विशेष काय असू शकते

अहवालानुसार, बाईक 8 kWh ते 10 kWh पर्यंतची बॅटरी वापरू शकते. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील सध्याच्या ट्रेंडनुसार, बाइकची पॉवर आणि पीक टॉर्क सुमारे 40 bhp आणि 100Nm असू शकते.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये कशी असतील

याच्या डिझाईन आणि फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी हे बुलेट मॉडेलसारखे (model) असू शकते अशी चिन्ह आहेत. त्याची रचना देखील समान असू शकते. याशिवाय जुन्या फिचर्ससोबत नवीन फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com