ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार चीनी कंपनीच्या भारतीय युनिट Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे 5,551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. याआधी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही 7 कोटींहून अधिकची संपत्ती ईडीने जप्त केली होती.
अंमलबजावणी संचालनालय (ED) ने आज परकीय चलन उल्लंघन केल्याप्रकरणी स्मार्टफोन कंपनी Xiaomi चे ₹ 5,000 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. Xiaomi India ही चीन-आधारित Xiaomi समूहाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींनुसार कंपनीच्या बँक खात्यातून ₹ 5,551.27 कोटी जप्त केले. केंद्रीय तपास एजन्सीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने केलेल्या बेकायदेशीर पैसे पाठविण्याच्या संदर्भात तपास सुरू केला होता. कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले कार्य सुरू केले आणि 2015 मध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तीन परदेशी-आधारित संस्थांना ₹ 5,551.27 कोटी इतके परकीय चलन पाठवले आहे, ज्यामध्ये एक Xiaomi समूह आहे. ईडीने आरोप केला, ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस आधारित (US Based) असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूहाच्या फायद्यासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती ईडीने दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.