अनेक बँकांचे पैसे बुडवून परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. ईडीने असे सांगितले आहे की विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या एसबीआयच्या (State Bank of India) नेतृत्वातील बँकांच्या कन्सोर्टियमला 5,824.5 कोटी रुपये दिले गेलेआहेत .
याबद्दल केंद्रीय तपास यंत्रणेनं माहिती देताना सांगितले आहे की ही रक्कम अँटी मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत यूनाइटेड ब्रेव्हरीज लिमिटेडचे जप्त असणारे शेअर विकून मिळाली आहे.23 जून रोजी या शेअर्सची विक्री झाली होती, जेव्हा ईडीने यूबीएलचे जवळपास 6,624 कोटी रुपयांचे शेअर्स एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांना हस्तांतरीत केले आहेत . विजय मल्ल्यावर अनेक बँकांचे एकूण 9000 कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप आहे.
या कारवाई बाबत अधीक माहिती देताना ईडीने सांगितले आहे की ,'आज एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांना त्यांच्या खात्यात 5824.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले असून ही रक्कम यूबीएलच्या समभागांची विक्री करुन करण्यात आली आहे. '
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.